eknath shindhe 
सोलापूर

मंत्री एकनाथ  शिंदे आले, मुंबईचे निमंत्रण देऊन गेले, संपर्कप्रमुख सावंतांची पुन्हा दांडी, शिवसैनिकांसोबतच संवाद राहूनच गेला 

प्रमोद बोडके

सोलापूर : शिवसेनेचे दिग्गज नेते, राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज सोलापुरच्या दौऱ्यावर होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. पहिल्या दौऱ्यात त्यांनी सोलापूरच्या नागरी भागाच्या विकासाचा आढावा घेतला. शासकिय विश्रामगृहाती अपुरी जागा, दौऱ्याचे कोलमडलेले नियोजन यामुळे शिवसैनिकांसोबत होणारा संवाद मात्र राहूनच गेला. राज्यात आपले सरकार आहे, आपण शिवसैनिकांना निधी कमी पडू देणार नाही. तुम्ही निधीसाठी मुंबईला या असे निमंत्रण त्यांनी न विसरता जिल्ह्यातील शिवसैनिक असलेल्या लोकप्रतिनिधींना दिले. 

राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पदाची संधी हुकल्यापासून सोलापूरचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत हे नाराज असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वेळा सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतरही गैरहजर राहिलेले संपर्कप्रमुख सावंत आजही गैरहजरच होते. त्यांची गैरहजेरी आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाण्याचा केलेला प्रयत्न या सोलापूरच्या शिवसेनेतील ताज्या घटना आहेत. या दोन्ही घटनांवर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे बोलण्याचे स्पष्टपणे टाळले. नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही बैठक राजकीय नसल्याचे सांगून वेळ मारून नेली तर शासकीय विश्रामगृहात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत हा प्रश्‍न शिवसैनिक आणि मंत्री शिंदे यांच्याकडून अनुत्तरितच राहिला. 

सोलापूर महापालिकेवर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. निवडणुकीच्या कामाला तुम्ही लागा असा कानमंत्र मंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत शिवसैनिकांना देत अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात बैठक आटोपती घेतली. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी सत्तेच्या काळात भाजपच्या नगरसेवकांना निधी दिला. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कॉंग्रेसच्या नगरसेवकांसाठी निधी आणला. शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी दिला मिळाला तरच महापालिकेची आगामी निवडणूक लढायला आम्हाला सोपे जाईल अशी मागणी या बैठकीत शिवसैनिक नगरसेवकांनी केली. त्यांच्या या मागणीला मंत्री शिंदे यांनी मुंबईच्या बैठकीचे निमंत्रण देत निधी देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT