Meeting 
सोलापूर

सीना-माढा योजनेत "या' गावांचा समावेश करण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सीना-माढा उपसा सिंचन योजनेत माढा तालुक्‍यातील बावी व इतर पाच गावांचा समावेश करण्याचे आदेश नुकतेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. बावी या गावचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी बावी संघर्ष समिती, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शंभुराजे मोरे यांनी एकत्र येऊन वेळोवेळी केलेल्या आंदोलनांची व उपोषणाची आमदार बबनराव शिंदे यांनी दखल घेत सोमवारी (ता. 3) मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत या गावांची समस्या मांडली.

3000 ते 3200 क्षेत्र येणार ओलिताखाली
या वेळी आमदार बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्‍यातील बावी तसेच तुळशी, पिंपळखुंटे, कुर्डू, अंबड, शिराळ ही गावे कायम दुष्काळी आहेत. या गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर असल्याबाबत तसेच या गावांचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश केल्यास सुमारे 3000 ते 3200 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याबाबत माहिती दिली व हा प्रश्‍न सोडविण्याबाबत मागणी केली. त्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून सर्व अहवाल पाहून वरील गावांचा सीना-माढा उपसा सिंचन योजनेत समावेश करण्याच्या सूचना/आदेश दिले.

या वेळी आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार भारत भालके, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, जिल्हा दूध संघाचे संचालक शंभुराजे मोरे, पाणी संघर्ष समिती बावीचे प्रशांत मोरे, कुर्डूचे संदीप पाटील, भारत कापरे, नामदेव हांडे, चौभे पिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे, पिंपळखुंटेचे पवनराजे पाटील, भोसरेचे सरपंच धनंजय बागल, विजय ठेंगल, आनंद मोरे, धीरज मोरे, बप्पा परबत तसेच शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT