MLA Jayant Asgavkar 
सोलापूर

अनुदानित-विनाअनुदानित शाळा हा प्रकार बंद करा व सरसकट अनुदान द्या : आमदार प्रा. आसगावकर 

विनोद देशमुख

कोळा (सोलापूर) : अनुदानित- विनाअनुदानित शाळा हा प्रकार बंद करून जे काही अनुदान द्यायचे असेल ते सर्वच शाळांना द्या, यासाठी आम्ही आमची भूमिका सरकारपुढे मांडणार असल्याचे मत पुणे शिक्षक संघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले. सांगोला तालुक्‍यातील जुनोनी येथे आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य ऍड. सचिन देशमुख, माजी प्राचार्य शितोळे, सुनील भोरे आदी उपस्थित होते. या वेळी कोळा जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांच्या वतीने ऍड. सचिन देशमुख यांनी नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा सत्कार केला. 

आमदार आसगावकर पुढे म्हणाले, जुन्या पेन्शनसाठी एक समिती नेमलेली आहे. त्याबाबत आम्ही लवकरच मुंबई येथे जाऊन समिती बरखास्त करा, अन्यथा त्या समितीमध्ये एक शिक्षक आमदार प्रतिनिधी असावा, अशी भूमिका मांडणार आहोत. त्याचबरोबर टप्पा अनुदानाची सुद्धा तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्वरित पगार सुरू करण्याची भूमिका शिक्षणमंत्री व अर्थमंत्री यांनी आमच्यासमोर कबूल केली आहे. त्यामुळे तपासण्या पूर्ण झाल्यानंतर तत्काळ शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न निकाली लागेल व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, खेळाडूंसाठी भत्ता असेल. याबाबत सुद्धा आम्ही भूमिका मांडू. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांनी शिक्षक व शिक्षकेतर यांच्याबाबत चुकीचे निर्णय घेतल्यास त्यांना आम्ही शंभर टक्के विरोध करू व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध असू. 

जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी शाळांच्या अनुदानाबाबत आपले विचार मांडले. या वेळी जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT