Bharat_Bhalke 
सोलापूर

सोलापूरच्या सामाजिक व राजकीय विश्‍वाला धक्का ! आमदार भारत भालके यांचे निधन 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्ट्रिक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे शुक्रवारी (ता. 27) रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले. 

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना डिसचार्ज मिळाल्यावर काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुणे येथे त्यांच्यावर उपचार केले जात होते. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

गेल्या काही वर्षांपासून आमदार भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डॉक्‍टरांकडे ते तपासणीसाठी जात असत. काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने ते स्वतः पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेथून बरे होऊन एक दिवस ते पंढरपूरलाही आले होते; परंतु त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने 
त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येत होते. आज (शुक्रवारी) दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. भारती यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सायंकाळी जाहीर केले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास भालके यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. 

कै. भालके यांच्या मागे श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक युवा नेते भगीरथ भालके, पत्नी, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT