Sampark Karyalaya 
सोलापूर

आमदार भालके यांचे संपर्क कार्यालय पुन्हा कार्यरत ! भारतनानांचा फोनही नागरिकांसाठी सुरू

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे मंगळवेढ्यातील त्यांचे बंद असलेले संपर्क कार्यालय जनतेच्या संपर्कासाठी खुले झाले आहे. 

अकरा वर्षांपासून जनतेच्या संपर्कात असलेले (स्व.) आमदार भारत भालके यांचे पुणे येथे उपचारादरम्यान 27 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या दिवसापासून हे संपर्क कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रलंबित शासकीय कामांसाठी शहर व ग्रामीण भागातून ये - जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली होती. शहर व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या अडचणीत मोठी मदत केल्याने आमदार भालके हे त्यांचे मोठे आधारवड होते. परंतु त्यांच्या अकाली जाण्याने गोरगरिबांचे हे आधारवड गेल्याने शहर व तालुक्‍यामध्ये शोककळा पसरली असतानाच प्रलंबित कामांच्या निपटाऱ्यासाठी हे संपर्क कार्यालय कधी खुले होणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. 

दरम्यान, मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील (स्व.) आमदार भालके समर्थकांनी सरकोली येथे विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांचे सांत्वन करून, आमदार भालके यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आम्ही पाठीशी आहोत, असा धीर दिला दिल्याने भालके कुटुंबीयांसह मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी गटावरील दुःख बाजूला ठेवत संपर्क कार्यालय जनतेच्या सेवेसाठी खुले झाले आहे. 

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे आलेला दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी हे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय भगीरथ भालके यांनी घेतला आहे. दु:खाचा डोंगर खांद्यावर घेत हे कार्यालय जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. (स्व.) भारत भालके यांच्याकडे असणारा मोबाईल क्रमांक भगीरथ भालके यांच्याकडे असून नागरिकांनी आपल्या कामासाठी नेहमीप्रमाणे मोबाईलवर संपर्क साधावा अथवा संपर्क कार्यालयात भेटावे. 
- रावसाहेब फटे, 
स्वीय सहायक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT