mla jagtap sakal
सोलापूर

Solapur News : खासदारकीसाठी मी सर्वांना चालणारा उमेदवार - जयवंतराव जगताप

माजी आमदार जगताप : तुमचे मिटत नसेल तर मी भाजपकडून लोकसभा लढतो

अण्णा काळे

करमाळा : ‘तुमचे मिटत नसेल तर मी भाजपकडून खासदारकी लढतो. खासदारकीसाठी मी सर्वांना चालणारा उमेदवार आहे’, असे वक्तव्य करमाळ्याचे माजी आमदार तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी केले आहे. यामुळे राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते- पाटील यांनी करमाळ्याचे माजी आमदार तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांची बाजार समिती कार्यालयात भेट घेतली.

धैर्यशील मोहिते- पाटलांची ही भेट जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती. मात्र, यावेळी माजी आमदार जगताप यांच्या, ‘तुमचे मिटत नसेल तर मी भाजपकडून माढ्यातून लढतो’, या वक्तव्यावरून भविष्यात जगताप पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.

जयवंतराव जगताप हे १९९० व २००४ असे दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते. २००९, २०१४ ला ते पराभूत झाले, तर २०१९ साली त्यांनी निवडणूक न लढवता आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला. आमदार संजय शिंदे यांना आमदार करण्यात जगताप यांचा मोठा वाटा आहे.

१९९० पासून ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काही काळ त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. सध्या जयवंतराव जगताप हे आमदार संजय शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांना नुकतीच भाजपच्या सोलापूर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी जिल्हाभर भाजपचे काम सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला! सिल्व्हर ओक निवासस्थानी सांत्वन भेट

Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Nagpur Municipal Corporation: नागपूर महानगरपालिकेत भाजपने १०२ नगरसेवकांचे राजीनामे घेतले; नेमकं कारण काय?

Pune News : वैद्यकीय पर्यटनाला मिळेल चालना, आयात शुल्क कमी केल्याने औषधे स्‍वस्‍त; आरोग्य क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले समाधान

SCROLL FOR NEXT