MLA Kalyanshetti 
सोलापूर

'तुम्ही माझ्या आवाहनाचा मान राखलात, मी पण माझ्या शब्दाला जागणार !'

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट विधानसभामधील 14 गावांतील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ज्या गावांनी निवडणुका बिनविरोध होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्या चौदा गावांतील समस्त ग्रामस्थांचे, राजकीय पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपण सर्वांनी गावातील एकोपा कायम राहावा म्हणून एकत्र येऊन निवडणुकीचा खर्च वाचवून गावाच्या भल्याचा विचार केला, त्यासाठी आपले मनस्वी आभार. मी जाहीर केल्याप्रमाणे "ज्या गावात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक पार पडेल अशा गावांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये विकासनिधी उपलब्ध करून देणार' हा शब्द पाळणार आहे. तुम्ही माझ्या आवाहनाचा मान राखलात, मी पण माझ्या शब्दाला जागणार आहे, असा संदेश अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नागरिकांना दिला. 

अक्कलकोट तालुक्‍यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या प्राप्त परिस्थितीत या निवडणुका घेतल्यास कोरोनाची साथ वाढू शकते. त्यामुळे आपल्या गावाची ग्रामपंचायत गावकरी मंडळींनी चर्चा करून बिनविरोध करावी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी 15 लाखांचा विकास निधी मिळवा, असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले होते. यास अनुसरून अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील एकूण 14 गावे बिनविरोध झाली आहेत. याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गावकऱ्यांनी सामंजस्याने चर्चा करून ग्रामपंचायत बिनविरोध केल्याने समाधान व आनंद व्यक्त केला आहे. 

गावकऱ्यांना संदेश देताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, की अक्कलकोट विधानसभामधील आंदेवाडी बु, शिरशी, उडगी, मातनहळी, नागनहळी, तोळणूर, हंद्राळ, कुमठे, बणजगोळ, बोरामणी, संगदरी, तिर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी आदी गावांनी निवडणूक बिनविरोधसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या गावांना प्रत्येकी पंधरा लाख रुपये विकासनिधी उपलब्ध करून देणार आहे. परत एकदा अभिनंदन आणि धन्यवाद! 

दरम्यान, अक्कलकोट तालुक्‍यातील दोड्याळ, शेगाव, गुड्डेवाडी, पितापूर, आंदेवाडी खुर्द तसेच सिन्नूर ही गावे बिनविरोध होता होता एक - दोन जागांसाठी निवडणुका लागल्या; अन्यथा ही सुद्धा गावे बिनविरोध झाली असती. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभारली प्रयोगशाळा

SCROLL FOR NEXT