MLA Yashwant Mane 
सोलापूर

मोहोळ मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध करा अन्‌ 31 लाख मिळवा ! आमदार माने यांची घोषणा 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. सर्वत्र आघाडी प्रमुखांची धावपळही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी "गावोगावच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करा व 21 आणि 31 लाखांचा विकास निधी मिळवा', अशी घोषणा केली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावकीतील व भावकीतील घराघरांत होणारे वादविवाद टाळण्यासाठी व गावात शांतता व गोडवा निर्माण व्हावा म्हणून माजी आमदार राजन पाटील व ज्येष्ठ नेते बळिराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ विधानसभा मतदार संघातील ज्या - ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत, त्या ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात. ज्या ग्रामपंचायतींची सदस्य संख्या एक ते नऊ आहे, त्या ग्रामपंचायतींना 21 लाखांचा तर 11 ते 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 31 लाखांचा बक्षीसरूपी निधी शासनाच्या विविध योजनेअंतर्गत वर्षभरात देण्याची घोषणा आमदार माने यांनी केली आहे. 

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, त्या ग्रामपंचायतीतील नागरिकांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गट - तट बाजूला ठेवून एकत्रित यावे व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहनही आमदार माने यांनी केले. 

दरम्यान, तालुक्‍यातील विरोधकांची जरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तरी राजकीय जोडे बाजूला ठेवून कुठलाही दुजाभाव न करता इतर ग्रामपंचायतीं प्रमाणेच त्यांनाही निधी देण्यात येणार आहे, अशी घोषणाही आमदार माने यांनी केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

'अरे हा तर आजोबा राजेश खन्नासारखा दिसतो' अक्षय-ट्विकलचा मुलगा आरवला पाहून चाहते शॉक, Viral Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Air India Pilot Alcohol Test : एअर इंडियाचा वैमानिक दारू पिऊन विमानात, झ्युरिच विमानतळावरील उड्डाणापूर्वीची घटना, थेट केलं निलंबन

SCROLL FOR NEXT