BJP Prachar 
सोलापूर

आमदार परिचारक म्हणाले, मतविभागणी टाळण्यासाठीच आम्ही आलो एकत्र !

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तिरंगी लढतीत मत विभागणीचा फायदा विरोधकांना झाला. त्यांच्या विरोधातील मतांची बेरीज जास्त होत असताना पराभव होत होता. ही मतविभागणी टाळण्यासाठी आम्ही एकत्र आलो, असा खुलासा आमदार प्रशांत परिचारक यांनी केला. 

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आमदार परिचारक समर्थकांची बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार परिचारक बोलत होते. या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उमेदवार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शशिकांत चव्हाण, विजय बुरकूल, गौरीशंकर बुरकूल, नामदेव जानकर, अरुण किल्लेदार, औदुंबर वाडदेकर, चंद्रशेखर कौडूभैरी, काशिनाथ पाटील, मधुकर चव्हाण, बबलू सुतार आदी उपस्थित होते. 

आमदार परिचारक पुढे म्हणाले, पंधरा वर्षात गुलाल पडला नाही, ती संधी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. आपल्या नावावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या हातून खोड्या होतात पण खापर मात्र आपल्यावर येते. कुणाला संपवण्यासाठी एकत्र आलो नसून जिंकण्यासाठी एकत्र आलो आहोत. 

या वेळी कार्यकर्त्यांनी दामाजी कारखाना, सोसायटी, जिल्हा परिषद व विकास कामासाठी आलेल्या अडचणी सांगितल्या. 

या वेळी माजी मंत्री ढोबळे म्हणाले, की तीन पक्ष एकत्र येऊन झालेले महाविकास आघाडी सरकार जनतेत नापास झाले आहे, हे दाखवण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. विजय प्राप्त करणे काळाची गरज आहे. 

आमदार रणजितसिह मोहिते- म्हणाले की, उमेदवारीवरून समझोता झाला, त्याप्रमाणे कुठल्याही मान- अपमानात न अडकता एकत्र प्रयत्न करूया. 

समाधान आवताडे म्हणाले, यापुढील निवडणुका सर्वांच्या विचाराने बिनविरोध कशा होतील याकडे लक्ष घालू. भूतकाळ विसरून उद्याची पहाट निर्माण करू 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karveer Police Action : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरेतील 'वरपे फार्म हाऊस'वर पोलिसांची धाड; अर्धनग्न अवस्थेत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला घेतलं ताब्यात

Diwali Special Buses: दिवाळीसाठी पुण्यातून १,२०० जादा बस;‘एसटी’चे नियोजन; दररोज एक लाख प्रवाशांची होणार वाहतूक

Aaryavir Sehwag Century : १९ चौकार, ८ षटकार! वीरूच्या लेकाचा जलवा, आर्यवीर सेहवागने १४३ चेंडूंत कुटल्या १७३ धावा...

Marathi News Live Updates: ज्ञानेश कुमार यांच्या निवड प्रक्रियेवर प्रकाश राज यांचे गंभीर सवाल

माहूर गडावरून परतताना भीषण अपघात! १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या ३ भाविकांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT