praniti-shinde.jpg 
सोलापूर

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ! भाजप असेपर्यंत एमआयएम राहणारच; विरोधकांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी चुकीची

तात्या लांडगे

सोलापूर : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत. सर्व व्यवस्थित सुरू असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही विरोधकांची मागणी निरर्थक आहे. अधिकाऱ्यांना केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा असून त्याशिवाय हे होऊ शकत नाही, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर केला.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे शनिवारी (ता. 27) आयोजित वार्तालापात आमदार शिंदे बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि केरळ विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी कॉंग्रेसच्या छाननी समितीतही त्यांचा सहभाग झाल्याबद्दल पत्रकार संघातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक केले.

महापालिकेवर असणार कॉंग्रेसचीच सत्ता
महापालिकेत सत्ताबदल घडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आगामी निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्‍वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. मागील निवडणुकीत गोरगरिबांचे झालेले हाल पाहता आता लॉकडाउन होणार नाही. मात्र, कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क हा एकमेव उपाय असल्याचे सांगून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

आमदार शिंदे म्हणाल्या, संघटना वाढविणे, कार्यकर्त्यांना ताकद देणे आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर आपण भर देणार आहोत. राज्यभरात जिल्हा व तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. मागासवर्गीयांच्या विकासासाठी त्यांच्या हक्‍काचा निधी खर्च व्हावा, याकडेही लक्ष दिले जाईल. 2014 पासून आतापर्यंत एमआयएममुळे कॉंग्रेसची मतविभागणी झाली आहे. भाजपचे तसे धोरण असून जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत एमआयएम राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वीजबिल माफ झाले पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी नेहमी आपण आग्रही आहोत. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ झाल्याने केरळमध्ये सत्तांतर घडून कॉंग्रेसला सत्ता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT