praniti-shinde.jpg 
सोलापूर

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या ! विकासाच्या गप्पा करुन महापालिकेत सत्ता मिळविलेल्या भाजपला बजेटही मांडता येत नाही

तात्या लांडगे

सोलापूर : विकासाच्या गप्पा करुन सत्तेवर आलेल्या भाजपने एकदाही महापालिकेचे बजेट वेळेवर मांडले नाही. बजेट मांडताना भाजप वेळ पाळत नाही. त्यांना बजेटही मांडता येत नाही. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा बजेट सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर आली, अशी टिका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. त्या प्रभाग क्र. 16 मधील विकास कामांचया उद्‌घाटनप्रसंगी बोलत होत्या.

दररोज नव्हे तर आठ दिवसाआड मिळते पाणी 
शहराचा सर्वांगिण विकास करु, नागरिकांना दररोज पाणी पुरवठा केला जाईल, अशी अनेक आश्‍वासने सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिली. मात्र, आपापले गट सांभाळणाऱ्या भाजपने विकासाच्या गप्पा मारुन सत्ता मिळविली. चार वर्षांनंतरही शहर असो वा हद्दवाढ भागातील नागरिकांना सात- आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. रस्त्यांची दुरावस्था झाली असतानाही नवा रस्ता सोडा, डागडूजीदेखील होत नाही, अशी टिकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली. 

नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या निधीतून गांधी नगर येथे रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 1) आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मल्लमा गौडा, गीता पल्ली, अनुराधा लिंगरकर, आकृती चनमल, विशाल कल्याणी, प्रशांत लोणार, सुनील इंजामुरी आदी उपस्थित होते. प्रारंभी नगरसेविका फिरदोस पटेल म्हणाल्या, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विकासकामांसाठी निधी मिळालेला नाही. प्रशासनावर त्यांचा अंकुश राहिला नसून उत्पन्न वाढीसाठी काहीच प्रयत्न दिसत नाहीत. त्यानंतर आमदार शिंदे यांनी भाजपवर जोरदार टिका केली. त्या म्हणाल्या, सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या गप्पा करून भाजपने केंद्रात व महापालिकेत सत्ता मिळविली. त्यांनी निवडणुकीपूर्वी शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन दिले. मात्र, त्याची पूर्तता अद्याप झाली नाही. कॉंग्रेस हा असा पक्ष आहे की, जो विकासकामांवर भर देतो. कॉंगेसची सत्ता असताना मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. सर्व नगरसेवकांना निधी दिला जात होता. परंतु, सध्या विकासकामाला महत्व दिले जात नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT