MLA Ranjit Singh Mohite Patil has appealed to Akluj, Natepute, Shripur Mahalungkars to boycott Gram Panchayat elections. 
सोलापूर

अकलूज, नातेपुते, श्रीपूर-महाळुंगकरांनो ग्रामपंचायत निवडणुकांवर घाला बहिष्कार ! आमदार मोहिते-पाटलांचे आवाहन

सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : शासन पातळीवर अकलूज नगरपालिका, नातेपुते, श्रीपुर-महाळुंग नगरपंचायती अशा प्रकारची सर्व कार्यवाही पूर्ण झाली असून, फक्त अंतिम आदेश येण्याची आपण वाट पाहत आहोत. त्यामुळे या चार गावांतील लोकांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर सर्वसंमतीने व सर्वांनी एकत्र येऊन बहिष्कार घालावा व शासनास नगरपालिका, नगरपंचायतीचा लवकरात लवकर आदेश काढेल हे पहावे, असे आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले.

शंकरनगर-अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत चार गावांवर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका लादल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. वास्तविक सप्टेंबर 2019 रोजी राज्यपालांनी अध्यादेश काढून ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये केले आहे. परंतु शासन दरबारी कागदपत्राची पूर्तता होईपर्यंत व राजकीय शक्तीच्या अभावामुळे सव्वा वर्ष झाले तरी अंतिम आदेश बाकी असतानाच ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला व त्यानंतर या सरकारला जाग आली. राज्यातील 13 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्याची निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली.

या 13 ग्रामपंचायतींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. परंतु या पत्राची दखल निवडणूक आयोगाने अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही माळशिरस तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतीवर निवडणुका लादल्या गेल्या आहेत. जनतेच्या भावनेची दखल घेऊन या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
या बैठकीस ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, किशोरसिंह माने-पाटील, धनंजय माने-देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, स्वरूपराणी मोहिते-पाटील, शशिकला भरते, फातिमा पाटेवाला, एन. के. साळवे, नंदकुमार केंगार उपस्थित होते. यावेळी कमाल शेख, संभाजी जाधव, मुक्तार कोरबू, नंदकुमार केंगार, प्रदुम्न गांधी, ऍड. भानुदास राऊत आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले. 

ही बैठक वस्तूस्थिती काय आहे? यासाठी बोलावली आहे. कुणावरही टीकाटिपणी करायचा हेतू नाही. 2018 पासून नगरपालिका, नगरपंचायतीसाठी काय काय केले हे जनतेला समजले पाहिजे. 
-  आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील 

विकास निधी जादा प्रमाणात येण्यासाठी सर्वांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालावा व पुढे ताकदीने लढावे. परंतु नगरपालिका, नगरपंचायतीस कुणी खो घालू नये. असे झाले तर आपला विकास खुंटणार आहे. 
- ऍड. भानुदास राऊत 

या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला पाहिजे व शासनाने ही निवडणूक प्रक्रिया त्वरित थांबवली पाहिजे. 
- नंदकुमार केंगार 

पाणी, आरोग्य, घरकुलासाठी ग्रामपंचायतीच्या चारपट निधी जादा येणार आहे. तसेच गोरगरिबांसाठी म्हाडाची योजना आपण राबवू शकतो. अकलूज, नातेपुते, महाळुंग ग़ामपंचायतीच्या निवडणुका वर बहिष्कार घालावा. 
- धैर्यशील मोहिते-पाटील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT