Ranjitsinh Mohite-Patil vs Ram Satpute esakal
सोलापूर

MP Assembly Election : महाराष्ट्रातील 'या' दोन आमदारांवर भाजपनं दिली 'मध्य प्रदेश'ची जबाबदारी; निवडणुकीत होणार फायदा!

राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

सकाळ डिजिटल टीम

दोघांनाही भाजपच्या (BJP) केंद्रीय स्तरावरून महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. यापूर्वीही गोवा येथे दोघांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली होती.

नातेपुते : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) व आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे.

मध्यप्रदेशातील अमरवाडा (जिल्हा छिंदवाडा) आणि केवलारी (जिल्हा सिवनी) या दोन मतदारसंघात मतदारांचा कानोसा घेणे, पक्ष संघटन मजबूत करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची तळागाळापर्यंत माहिती देणे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वरील दोन्ही उमेदवार निवडून आणणे अशी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलीये.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा आणि प्रदेश पातळीवर अध्यक्ष म्हणून महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी राज्यात किमान सात ते आठ वेळा प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत दौरा करून पक्ष वाढविण्यास मोठी मदत केली होती.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच आमदार राम सातपुते यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दांडगा अनुभव आहे. संघटन कौशल्य, वक्तृत्व आणि समोरच्या माणसांचे मन जिंकणे यात त्यांचा हातखंडा आहे.

त्यामुळे दोघांनाही भाजपच्या (BJP) केंद्रीय स्तरावरून महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. यापूर्वीही गोवा येथे दोघांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली होती, त्यात त्यांना यश आले होते. यावेळीही अमरवाडा मतदारसंघ रणजितसिंह यांना व केवलारी मतदारसंघ सातपुते यांना पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT