MLA Rohit Pawar has met former minister Dilip Sopal 2.jpg
MLA Rohit Pawar has met former minister Dilip Sopal 2.jpg 
सोलापूर

आमदार रोहित पवार यांनी घेतली माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट ; राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या उंचावल्या भुवया

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना, आरोपांच्या फैऱ्या झडत असतानाच राजकारणाची नवी दिशा आमदार रोहित पवार यांनी बार्शीकरांना दाखवून दिली. माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पवार-सोपल यांची झालेली भेट हा चर्चेचा विषय ठरला आहे.
 
राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या माजीमंत्री दिलीप सोपल यांनी माझा पक्ष असे म्हणत तालुक्‍यात 35 वर्षांपेक्षा जास्त वर्षे काम केले आहे. पक्षाने दिलेले मंत्रीपद, पालकमंत्री अशी पदे भूषवली आहेत. पण मागील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बाजूला ठेवून शिवसेनेचा भगवा हातात घेत शिवसेनेत प्रवेश केला.
 
विधानसभा निवडुकीनंतर मागील एक वर्षामध्ये पवार कुटुंबातील कोणीही सोपल यांच्याशी संपर्क साधल्याचे ऐकीवात नाही. पण पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार बार्शीमध्ये येताच त्यांनी सोपल यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे. माजी मंत्री सोपल यांचे पवार कुटुंबियांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबध, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असोत वा अजितदादा, निवडणुकीवेळी सोपल यांच्या बंगल्यावर मुक्काम होऊन राजकारणाची दिशा ठरवली जात असे हे बार्शीकर विसरणार नाहीत. 

नातं जपण्यासाठी राजकारण आलं पाहिजे असं नाही, विचार घेऊन पुढे जायचे असते. पवारांचा वारसदार जनता ठरवत असते व्यक्ती ठरवत नाहीत. पवारांचे सोपल जुने कार्यकर्ते असून अनेक वर्षे पक्षात काम केले आहे. म्हणून सोपल यांची भेट घेतली असल्याचे यावेळी आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. 

आमदार रोहित पवार भेटण्यासाठी आले होते. प्रकृतीची तसेच पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी पाठिंबा असावा, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी चर्चा झाली. बाकी राजकीय काहीं चर्चा झालेली नाही. 
- दिलीप सोपल, माजी मंत्री, बार्शी.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT