MHADA Sakal media
सोलापूर

बिचाऱ्या आमदारांना फक्त घरे देऊन चालणार नाही, तर महिन्याला रेशनही सुरू करा

आमदारांना मुंबईत घर देण्यावरून सोशल मीडियावर होते टीका-टिप्पणी

दत्तात्रय खंडागळे, सांगोला

सांगोला : मुंबईत आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरून सोशल मीडियावर मोठी टीका-टिप्पणी होवू लागली आहे. 'ठाकरे साहेब, बिचाऱ्या आमदारांना फक्त घरे देऊन चालणार नाही, तर महिन्याला रेशनही सुरू करा!' अशा संतापजनक भावना सामान्यजण सोशल मीडियावर व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने आमदारांना मुंबईत घर देण्याच्या निर्णय झाल्यानंतर या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर अनेक टिकाटिप्पणी होऊ लागल्या आहेत.

एकीकडे बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, एसटी कामगारांचा संपावर तोडगा निघत नाही अशा परिस्थितीत आमदारांना मुंबईत घरे का दिली जाणार आहेत ? राज्यशासनाने फक्त आमदारांना घर देवुन चालणार नाही तर त्यांना उपजीविकेसाठी महिन्याला रेशनही सुरू केले पाहिजे अशा टिप्पणी केली जात आहेत. कोरोना, अतिवृष्टीच्या काळामुळे शेतकर्‍यांवर संकट आले असताना, वीज बिलासाठी शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली जात आहे याकडे सरकारचे लक्ष जात नाही. परंतु आमदारांच्या घराकडे मात्र लगेचच लक्ष जाते. 'बेघर आमदारांना घर दिलचं पाहिजेत आणि तो आमचा हक्क आहे !' पंचावन्न - साठ वर्षे सरकारी सेवेत काम करणाऱ्यांना पेन्शन बंद केली जाते, तर पाच वर्षे आमदारकी भोगल्यानंतर पेन्शन का मिळते ? 'राज्याच्या जनतेचा पैसा वाचावा म्हणून निवृत्तिवेतन आला कात्री लावणारे पंजाबचे मुख्यमंत्री तर कोणतीही मागणी केली नसताना जनतेच्या पैशातून 300 आमदारांना घरे देणारे आमचे मुख्यमंत्री' अशी टिप्पणीही सोशल मीडियावरून होत आहे.

तेरी भी चुप, मेरी भी चुप -

सरकारने मुंबई आमदारांना घर देण्याच्या निर्णयावरून सामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना राज्यातील विरोधी नेतेमंडळी, आमदार हे या निर्णयाविरुद्ध उघडपणे काहीही बोलत नाहीत. एकीकडे साध्या-साध्या गोष्टीवरून विधानसभेत, विधानभवनाबाहेर मोठा हंगाम करणारे हेच नेतेमंडळी मुंबईतील आमदारांच्या घरांच्या निर्णयावर काहीही बोलत नाही. त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक या निर्णयावर 'तेरी भी चुप, मेरी भी चुप' अशी अवस्था झाली आहे.

आम्ही सरकारी सेवेत शिक्षक म्हणून वयाच्या 55 - 60 वर्षापर्यंत काम करीत राहणार. भविष्यातील येणारी पिढी घडवण्याचे काम आमच्या हाती आहे. परंतु सरकारने आमचे निवृत्ती वेतन बंद केले आहे. परंतु आमदारांच्या निवृत्तीवेतन वाढ करून त्यांना इतर अनेक लाभ दिले जात आहे हे लोकशाहीत योग्य नाही. असे लाभ घेण्यासाठी सर्वपक्षीय आमदार एक होतात परंतु समाजहिताच्या निर्णयासाठी हेच एकमेकांविरुद्ध राजकारण करतात

- एक प्राथमिक शिक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT