chikhlthanchikhlthan 
सोलापूर

केळी उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्यात केळी संशोधन केंद्राची गरज

गजेंद्र पोळ

चिखलठाण (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकासाठी असणारे पोषक वातावरण आणि मोठ्या प्रमाणावर वाढत असलेले या पिकाखालील क्षेत्र याचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी कंदर (तालुका करमाळा) येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले. 

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. ऊस पिकासाठी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचा विचार करताना दिसत आहेत. या पिकासाठी पोषक असे वातावरण या जिल्ह्यांमध्ये असल्याने मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम केळीचे उत्पादन होऊन आखाती देशाबरोबरच युरोपियन देशांमध्येही केळीची निर्यात होऊ लागली आहे. हे जिल्ह्यात या पिकाच्या संदर्भातील संशोधन मोठ्या प्रमाणावर झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन संपूर्ण देशात निर्यातक्षम केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून जिल्ह्याची नवीन ओळख होऊ शकते. 

या पिकांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याने संशोधन केंद्रासह कुशल मजुरांसाठी प्रशिक्षण केंद्र, शेतकऱ्यांना खत तपासणीसाठी प्रयोगशाळा, दर्जेदार रोपांची निर्मिती यासाठी विविध सुविधा पुरवण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी प्रतिपादनही केले. केळी निर्यातदार किरण डोके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी निर्यातक्षम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कंदर अँड जालिंदर बसळे, नानासाहेब मनोहर लोकरे, आनंद मोहीते, संतोष कदम, रंगनाथ शिंदे, युवराज डोंगरे, महावीर साळूंखे आणि चैतन्य पाठक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT