MLA Sujit Singh Thakur FIR in Pandharpur police 
सोलापूर

संचारबंदीचे उल्लंघन; भाजपचेआमदार सुजितसिंह ठाकुर यांच्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करून श्री विठ्ठल रुक्मिणीची चैत्री एकादशीची पूजा केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुजितसिंह ठाकुर आणि शिवसेनेचे पंढरपुर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य असलेले आमदार श्री. ठाकूर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. शिंदे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन चैत्री एकादशी दिवशी पूजा केली. संचारबंदी असताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला या कारणावरून श्री. ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांनी आमदार श्री. ठाकूर आणि श्री. शिंदे या दोघांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बसचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परतताना ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्याकडे टिकल्या उडवायची बंदुक! बंदुक, कोयता घेऊन दोघे शिरले ज्वेलर्स दुकानात, पण एक दागिनाही न घेता ३० सेकंदात झाले पसार, वाचा...

INDW vs SAW Final: शफाली वर्मा-दीप्ती शर्माची अर्धशतकं, ऋचाची वादळी खेळी; World Cup जिंकण्यासाठी भारताचे द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य

Kisanrao Hundiwale Murder Case: किसनराव हुंडीवाले हत्याकांडाची सुनावणी उद्यापासून; अॅड. उज्ज्वल निकम जिल्हा व सत्र न्यायालयात करणार युक्तीवाद

Leopard Attack: 'थोरांदळे परिसरात दुचाकीवरून घरी चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला'; जखमी रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT