MNS. 
सोलापूर

पंढरपुरात मनसेची अनोखी गणेशसेवा; घराघरांत मोफत पोचवल्या "इतक्‍या' हजार गणेशमूर्ती 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या संकट काळात पंढरपुरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी यंदा अनोखी गणेशसेवा केली आहे. बाजारातील नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी शहर व परिसरातील गणेशभक्तांना स्वखर्चातून नऊ हजार 368 गणेश मूर्तींचे घरोघरी जाऊन मोफत वाटप केले आहे. मनसेच्या या अनोख्या गणेश मूर्ती वाटप उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

यावर्षी कोरोनाच्या सावटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गर्दीबरोबरच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवांवर यंदा बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, घरगुती गणेश उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात नागरिकांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी शहर व परिसरातील नागरिकांना स्वखर्चातून मोफत घरपोच गणेश मूर्ती देणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले होते. मनसेच्या या आवाहनाला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवसांत मनसेच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी शहरातील घरोघरी जाऊन नऊ हजार 368 गणेशभक्तांना गणेश मूर्तींचे मोफत वाटप केले. 

गणेश मूर्तींचे वाटप करण्यासाठी कार्यकर्त्यांचे दहा गट तयार केले होते. त्यानुसार शहरातील प्रत्येक भागांतील नागरिकांच्या घरी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तींचे वाटप केले. गणेश भक्तांनीही घरी आलेल्या गणरायांचे भक्तिभावाने स्वागत केले. वाटप केलेल्या सर्व गणेशमूर्ती या पर्यावरणपूरक असून त्या शाडू मातीपासून व नैसर्गिक रंगांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आहेत.

यावर्षी पंढरपूर शहरात गणेश मूर्तींची निर्मिती कमी प्रमाणात झाली आहे. उस्मानाबाद, पेण, सोलापूर आदी ठिकाणाहून गणेशमूर्ती आणल्या आहेत. येथील मनसे कार्यकर्त्यांनी राबवलेल्या मोफत गणेश मूर्ती उपक्रमाचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कौतुक करत सर्व गणेशभक्तांना व कार्यकर्त्यांना गणेश चतुर्शीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली. हा उपक्रम राबवण्यासाठी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड, सागर घोडके, महेश पवार, नागेश इंगोले, प्रताप भोसले, अभिजित डुबल, अवधूत गडकरी, कुणाल पवार, पूजा माळी, रोहन पंढरपूरकर आदींनी परिश्रम घेतले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT