Manase 
सोलापूर

"बचत गट, बॅंका व फायनान्सचे कर्ज माफ करा' : मनसेच्या मोर्चातील हजारो महिलांची पंढरपूर तहसीलवर धडक 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या प्रमुख मागणीसाठी मनेसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 

कोरोनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे अनेक छोटेमोठे उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे उद्योग- व्यवसाय बंद पडल्याने हाल सुरू आहेत तर दुसरीकडे कर्ज वसुलीसाठी बॅंका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. अधिकाऱ्यांच्या सततच्या तगाद्यामुळे अनेक ठिकाणी आत्महत्या घडू लागल्या आहेत. तर बॅंकांचे आणि फायनान्सचे अधिकारी दमदाटी करून वसुली करत आहेत. यामुळे महिलांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यातूनच मंगळवारी बचत गटांनी, बॅंकांनी आणि फायनान्स कंपन्यांनी दिलेले कर्ज माफ करावे या मागणीसाठी महिलांनी मनसेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चातील महिलांनी सरकारच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त करत कर्ज माफ करण्याची मागणी केली. स्टेशन रोडवरुन मोर्चा थेट तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. मोर्चातील महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहून पोलिसांनी मोठा पोलिस बंद लावला होता. 

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या महिलांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. कुटुंबाची वाताहत सुरू आहे. त्यामुळे महिला बचत गटांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे कर्ज माफ करावेत, अन्यथा सरकार आणि संबंधित बॅंकांच्या विरोधात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी या वेळी दिला. 

या वेळी नायब तहसीलदार सुरेश तिटकारे यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. मोर्चामध्ये मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, निकिता पवार, रंजना इंगोले, पूजा लावंगकर, महेश पवार, सागर घोडके, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, अनिता गायकवाड, प्रशांत इंगळे, दीपाली थोरात, नागेश इंगोले, दिलीप पाचंगे, बालाजी वाघ, अमर कुलकर्णी आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT