mohol bus stand became thief house police action required solapur palkhi route  sakal
सोलापूर

Solapur News : मोहोळ बस स्थानक बनले चोरांचे आगार विविध उपाय योजनांची गरज

मोहोळ हे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती बस स्थानक

राजकुमार शहा

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ बस स्थानक चोरांचे आगार बनले असून चोऱ्या रोखण्यासाठी विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे. मोहोळ हे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती बस स्थानक आहे.

या बस स्थानका वरून दररोज सुमारे सातशे ते आठशे विविध आगाराच्या बस गाड्यांची ये जा सुरू असते. मोहोळ हे मध्यवर्ती असल्याने राज्यात येथून कोठेही जाता येते. पालखी मार्ग होण्या अगोदर हे बस स्थानक मोठे होते, मात्र पालखी मार्गात जागा गेल्याने बसस्थानक लहान झाले आहे.

त्यामुळे बस गाड्यासह प्रवाशांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवासी बस मध्ये चढताना गर्दीमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्ही ची रचना व्यवस्थित नसल्याने चोरटा चोरी करून जरी गेला तरीही सीसीटीव्ही त त्याचे फुटेज दिसत नाही.

बस स्थानकाच्या चारी बाजूने सीसीटीव्ही असायला पाहिजेत मात्र ते एकाच बाजूला असल्याने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या बस मधील काहीच दिसत नाही."लाँगरूट" च्या बस मधे सुशिक्षित प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात.

त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे सारखे साहित्य असते. मात्र बस स्थानकावर गाडी थांबली की चोरटे आपला कार्यभाग साधतात. पुणे, मुंबई, कोल्हापूर या भागातील प्रवासी या बस मध्ये असतात. चोरी झाली की प्रवाशाला तक्रार द्यावयासाठी पोलीस ठाण्यात यावे लागते. त्या ठिकाणी पोलिसी सोपस्कार होई पर्यंत बराच वेळ जातो त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.

सध्या बस स्थानकात वृत्तपत्रे व ज्युस विक्रीचा स्टॉल आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत तोच मुख्य पॉईंट आहे. मात्र सीसीटीव्ही कुठे असावेत त्यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्हीची जोडणी करावी तेव्हा चोऱ्यांना आळा बसेल असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर-मंतरवरील आंदोलनात योगेंद्र यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कपिल सिब्बल, प्रशांत भूषणही आंदोलनात सहभागी

Google वर Customer Care Number Search करताय? थांबा! ‘ही’ चूक तुमचे पैसे उडवू शकते

नवरात्रीत सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार? जाणून घ्या तिरक्या मानेमागची रंजक आख्यायिका

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

SCROLL FOR NEXT