Flemingo 
सोलापूर

जिल्ह्यात पक्ष्यांच्या अडीचशे प्रजाती ! मोहोळमध्ये आहे माळरानावरील व जलसाठ्यांवरील पक्ष्यांचा अधिवास 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात विविध पक्ष्यांच्या सुमारे अडीचशे जातींचे निरीक्षण नोंदविण्यात आले असून, मोहोळ तालुक्‍यात दोन प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. त्यात माळरानावरचे पक्षी व जलसाठ्यावरील पक्षी यांचा समावेश आहे. 

तालुक्‍यात पक्ष्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा आष्टी तलाव असून या ठिकाणी थंडीत दुरून येणाऱ्या पक्ष्यांचे संरक्षण झाले पाहिजे, त्यांच्या शिकारीवर निर्बंध आणले पाहिजेत तरच पक्ष्यांच्या प्रजाती जिवंत राहणार असल्याची माहिती मोहोळ येथील पक्षी निरीक्षक डॉ. अविनाश राऊत दिली . 

जिल्ह्यात प्रथमच या वर्षीपासून पक्षी सप्ताह सुरू असून, त्या संदर्भात पक्षी निरीक्षक डॉ. राऊत माहिती देत होते. प्रत्येक वर्षी हिवाळ्यात न चुकता स्थलांतरित पक्षी आपल्या भागात मोठ्या संख्येने येतात. त्यात ग्रेटर फ्लेमिंगो, पेंटेड स्टार्क, व्हाईट स्टार्क, सीगल हेरॉन्स यांसह अन्य प्रजातींचा समावेश आहे. मोहोळ तालुक्‍यात देवडी, पापरी, नजीक पिंपरी यासह अन्य ठिकाणी मोठी जंगले आहेत. या ठिकाणी दोन प्रकारच्या टिटवी, इंडियर कर्सर यांसारखे कायमचे स्थायिक पक्षी आढळून येतात. तर मोंटेगू हरियर, पॅलीड हरियर, बोनाली ईगल यासह अन्य पक्षी हे स्थलांतरित आहेत. 

पक्ष्यांचे मुख्य अन्न हे किडे, मुंग्या व कीटक असल्याने ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. तसेच पक्षी हे नैसर्गिक कीटकनाशक असल्याने पिकांवरील किडीचा नायनाट करतात. आष्टी तलावावर फ्लेमिंगोचे मोठ - मोठे थवे प्रत्येक वर्षी येतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या पक्षी निरीक्षणासाठी टॉवर उभारणे गरजेचे आहे. तसेच पर्यटनाद्वारे अनेकांना उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध होणार आहे. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण व शहरी भागात आढळणाऱ्या चिमण्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. सिमेंटच्या बंगल्यामुळे चिमण्यांना घरट्यांसाठी जागा मिळणे अवघड झाले आहे. स्थानिक झाडे लागवडीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यात वड, पिंपळ, आंबा, चिंच ही देशी झाडे लावावीत, जेणेकरून या झाडांवर घरटी करून पक्षी या झाडांच्या फळांवर उदरनिर्वाह करतील. विदेशी झाडे लावणे टाळावे. तसेच प्रत्येकाने आपल्या घरासमोर चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करावीत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT