Loksabha Election Voting sakal
सोलापूर

Loksabha Election Voting : सोलापूर लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी मोहोळ पोलीस प्रशासन सज्ज ; 455 जणावर कारवाई 30 जण तडीपार

सोलापूर लोकसभेची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, मोहोळ पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये एकूण 455 जणावर कारवाई करण्यात आली आहे.

राजकुमार शहा

मोहोळ : सोलापूर लोकसभेची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, मोहोळ पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये एकूण 455 जणावर कारवाई करण्यात आली आहे. 30 जणांना तडीपार केले आहे. पोलीस कर्मचारी व होमगार्ड मिळून 723 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक राऊत म्हणाले, लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी हिंगोली, नाशिक, बुलढाणा, परभणी, यवतमाळ आदी भागातून 600 पोलीस कर्मचारी बंदोबस्ता साठी आले आहेत. त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय वडवळ येथील भक्त निवासात करण्यात आली आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यातील 61 पोलीस कर्मचारी व 62 होमगार्ड असा एकूण 723 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड तैनात केले आहेत .केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या आठ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

दररोज नाकाबंदी, गस्त तसेच वाहने तपासणी सुरू आहे. मतदाना दिवशी महसूल विभागाचे 20 व पोलीस विभागाचे 5 असे एकूण 25 सेक्टर कार्यरत असणार आहेत. तसेच स्ट्रायकिंग फोर्स ही यंत्रणा सज्ज आहे. फ्लाईंग स्कॉड, स्थिर सर्वेक्षण पथक ही यंत्रणा ही सज्ज आहे. या संपूर्ण पोलीस बंदोबस्तावर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांचे नियंत्रण असणार आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघावर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर हे लक्ष ठेवून असल्याचे पोलीस निरीक्षक राऊत यांनी सांगितले.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक हालचालीवर आमचे बारीक लक्ष असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्याची गय केली जाणार नाही.

सुरेशकुमार राऊत

पोलिस निरीक्षक,मोहोळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT