Milk Rate esakal
सोलापूर

Milk Rate : ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला घरघर! दुधाचे दर कमी, पशु खाद्यांचे व चाऱ्याच्या दारात वाढ

गेल्या साधारण महिन्या पासून कमी झालेले दुधाचे दर, तर पशुखाद्य, हिरवा चारा, चुरापेंड यांचे वाढलेले दर यामुळे ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला घरघर लागली आहे.

राजकुमार शहा

मोहोळ - गेल्या साधारण महिन्या पासून कमी झालेले दुधाचे दर, तर पशुखाद्य, हिरवा चारा, चुरापेंड यांचे वाढलेले दर यामुळे ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला घरघर लागली आहे. दरम्यान भविष्यातील चारा, पाणी टंचाईची चाहूल लागल्याने दावणीला असलेली दुभती जनावरे शेतकरी येईल त्या किमतीला विकू लागला आहे. त्यामुळे मोठा अर्थीक तोटा सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. शेतीतील उत्पन्न पीक लागवडी नंतर किमान सहा महिने तरी येत नाही, तो पर्यंत खर्चासाठी म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर ठरतो. रासायनिक खताचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी आता रासायनिक खता ऐवजी शेण खताकडे वळला आहे.

जर्सी दुभत्या गायीच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. ज्या शेतकऱ्याकडे घरचा चारा उपलब्ध आहे त्याला दूध व्यवसाय थोडाफार परवडतो. मात्र विकत घेऊन चारा घालणे हे परवडणारे नाही. गेल्या सुमारे महिन्या पासून दुधाचे दर लिटरला चार ते पाच रुपयांनी कमी झाले आहेत. अनेक शेतकऱ्याकडे किमान दहा ते पंधरा दुभत्या जर्सी गाई आहेत.

चांगले दूध देणाऱ्या गाईची किंमत 90 हजारापासून सव्वा लाखा पर्यंत आहे. मात्र भविष्यातील धोका ओळखून 90 हजाराची गाय 50 ते 60 हजाराला शेतकरी विकू लागला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. चाऱ्यासाठी म्हणून मका लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या साखर कारखाने सुरू आहेत.

त्यामुळे उसाचे हिरवे वाढे उपलब्ध आहे. मात्र कारखाने बंद झाल्यानंतर चाऱ्याची मोठी अडचण होणार आहे. एकूण परिस्थिती पाहिली असता या सर्व अडचणीमुळे दूध व्यवसायाला घरघर लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT