mohol supriya sule somesh kshirsagar meeting  sakal
सोलापूर

Solapur: शिंदे सेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट; चर्चेला उधान

Solapur: खासदार सुप्रियाताई सुळे यांची मोहोळ चे शिंदे सेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी भेट घेतली.

राजकुमार शहा

मोहोळ: येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची मोहोळ चे शिंदे सेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. त्यामुळे तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

श्री क्षीरसागर यांनी मोहोळ विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नां संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. जेष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षा पासून क्षीरसागर कुटुंबीय समाजकारण व राजकारणात सक्रिय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मोहोळ विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली.

अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय संदर्भात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने जो लढा दिला होता, त्या संदर्भात ही माहिती दिली. धनगर जमातीला एस.टी (ST) प्रवर्गातील आरक्षण मिळावे, महाराष्ट्रभर जी आंदोलने होत आहेत त्या पार्श्वभूमीवर धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रा साठी राज्यस्तरीय विशेष कमिटीचा सदस्य या नात्याने खा. सुळे यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

Ramdas Athawale: अभिजित दीपके यांना रामदास आठवलेंचे RPIत येण्याचे निमंत्रण; ‘सुशिक्षित युवा नेतृत्वाची गरज’

Latest Marathi News Live Update : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; पाच जण जखमी

Amit Thackeray: ‘रस्त्यात डांबर, पेव्हर ब्लॉक अन् काँक्रीटचा पॅच; हा कसला विकास?’ अमित ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

SCROLL FOR NEXT