solapur zp sakal media
सोलापूर

मोहोळ : आरक्षण बदलामुळे 'दोन सभापती दोन उपसभापतींचा पत्ता कट'

मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आरक्षणा बदलामुळे दोन सभापती, दोन उपसभापती यांचा पत्ता कट झाला आहे.

राजकुमार शहा

मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आरक्षणा बदलामुळे दोन सभापती, दोन उपसभापती यांचा पत्ता कट झाला आहे.

मोहोळ - मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आरक्षणा बदलामुळे दोन सभापती, दोन उपसभापती यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजन पडले आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सावळेश्वर गण हा ओबीसी महिलेसाठी आरक्षित होता, त्यामुळे समता गावडे या निवडून येऊन पहिल्या अडीच वर्षात सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या, तर दुसऱ्या अडीच वर्षात नरखेड पंचायत समिती गणातून ओबीसी गटातून निवडून आलेल्या रत्नमाला पोतदार यांची दुसऱ्या अडीच वर्षात सभापती पदी वर्णी लागली होती. नवीन झालेल्या आरक्षण रचनेत सावळेश्वर व नरखेड पंचायत समिती हे गण अनुक्रमे अनुसूचित जाती साठी खुला व सर्वसाधारण जागेसाठी खुला झाल्याने दोन्ही उपसभापतींचा पत्ता कट झाला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षात उपसभापतीपदी निवडून आलेल्या साधना देशमुख यांची उपसभापती पदी निवड झाली होती, त्यांचा खंडाळी हा मतदार संघ नव्या रचनेनुसार अनुसूचित जातीच्या महिला साठी आरक्षित झाला आहे तसेच दुसऱ्या अडीच वर्षात उपसभापतीपदी काम केलेले अशोक सरवदे यांचे नजीक पिंपरी हे गाव नव्या रचनेत सय्यद वरवडे गणात गेले आहे नवीन आरक्षणा नुसार सय्यद वरवडे हा गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने सरवदे व देशमुख यांचा पत्ता कट झाला आहे.

कुरुल पंचायत समिती गणातून गेल्या पंचवार्षिक मध्ये जालिंदर लांडे हे कुरुल पंचायत समिती गणातून सर्वसाधारण जागेवरून निवडून आले होते हा मतदारसंघ ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणचीही राजकीय समिकरणे बदलली आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पोखरापूर पंचायत समिती गण हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होतात सध्या तो ओबीसी साठी राखीव झाला आहे त्यामुळे या ठिकाणच्या विद्यमान सदस्यांचे पत्ते कट झाले आहेत. दरम्यान आष्टी, नरखेड, कामती, टाकळी सिकंदर हे पंचायत समिती गण सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणी माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण, यांची जादू चालणार आहे. दरम्यान मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील व त्यांचे दोन सुपुत्र हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने संभ्रम निर्माण झाला आहे. समजा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाच तर मात्र सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत त्यामुळे आज अंदाज वर्तविणे अडचणीचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT