Books Distribution sakal
सोलापूर

Mohol News : शाळेच्या पहिल्याच दिवशी एक लाख 40 हजार पुस्तकांचे वाटप होणार

समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हाती एक लाख 38 हजार 200 नव्या कोऱ्या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.

राजकुमार शहा

मोहोळ - समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या 35 हजार 854 विद्यार्थ्यांच्या हाती एक लाख 38 हजार 200 नव्या कोऱ्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे, सदर पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली असून 7 जून पासून केंद्र स्तरावर पुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका गट शिक्षण अधिकारी मल्लिनाथ स्वामी यांनी दिली.

यावर्षी पाठय पुस्तकात प्रत्येक धड्या पाठोपाठ वह्यांची पाने समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र वही शाळेत आणण्याची गरज नसल्याने दप्तरांचे ओझे कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य गीताचीही छपाई करण्यात आली आहे.

15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या -247, माध्यमिकच्या -62 व खाजगी 4 अशा एकूण 313 शाळांत ही पुस्तके वितरित केली जाणार आहेत.

इयत्ता पहिली ते 5 वीचे एकूण 21 हजार 997 तर इयत्ता 6 वी ते 8 वीचे 13 हजार 857 असे मिळून एकूण 35 हजार 854 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत. तालुक्यातील 15 केंद्रातुन शाळास्तरावर केंद्र प्रमुखांनी 12 व 13 जून रोजी शाळेत सदर पुस्तके वितरित करण्याचे नियोजन केले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, गावातील सरपंच,उपसरपंच व पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या हस्ते वितरण होणार आहे.

या वर्षीची पाठय पुस्तके ही शासनाने जाहीर केल्या प्रमाणे प्रत्येक इयतेची चार विभागात सर्व विषय समाविष्ट केलेली आहेत. एक सत्र एक पुस्तक या प्रमाणे प्रत्येक भाग हा 3 महिन्यासाठी असणार आहे. चालू वर्षीची नवीन पुस्तके पाहून शिक्षकही सुखावले आहेत. या पुस्तकात यंदा पासून प्रथमच प्रत्येक धड्याच्या शेवटी कोरी पाने वर्ग व गृह पाठासाठी दिली आहेत,त्यामुळे विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाची स्वतंत्र वही आणण्याची गरज नाही.धडा संपताच त्यातील अवघड शब्द,कठीण प्रश्नांची उत्तरे तिथेच लिहली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जाणार आहे. स्वतंत्र वही सोबत न्यावी लागणार नसल्याने दप्तरांचे ओझे कमी होणार आहे..

या वर्षीच्या पाठय पुस्तकांत राज्यगीताची छपाई

विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच राज्य गीताबद्दल माहिती व्हावी,त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने बालभारतीने पुस्तकांत "जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा"या राज्य गीताची छपाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT