Solapur News esakal
सोलापूर

Solapur News : दिंड्या व पालख्याच्या स्वागतासाठी मोहोळ तालुका सज्ज,दोन ठिकाणी हिरकणी कक्ष

मोहोळ तालुक्यातून अनेक दिंड्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.

राजकुमार शहा

पाटकुल : मोहोळ तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, दिंड्या यांच्या स्वागतासाठी ची तयारी पूर्ण झाली असून, महिला वारकऱ्यांसाठी आंघोळीला शॉवर व हिरकणी कक्षाची स्थापना केल्याची माहिती महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातून अनेक दिंड्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. मात्र आष्टी व शेटफळ या ठिकाणाहून जाणाऱ्या दिंड्यात महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय असते. महिला वारकऱ्यांच्या सोयीसाठी वरील दोन ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यात स्तनदा मातांची वेगळी व्यवस्था केली आहे, तसेच त्या ठिकाणी सॅनिटरी पॅडची सुविधा देण्यात आली आहे. या कक्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण, बाल विकास, ग्रामविकास योजनेची तसेच महिला आयोगाच्या कामकाजाची माहिती देण्यात येत आहे.

दरम्यान आष्टी येथील ग्राम विकास अधिकारी दीपक शेळके यांनी दिलेल्या माहिती नुसार, आलेल्या वारकऱ्याना आंघोळीसाठी शॉवर, त्यांच्या स्वागतासाठी कमान ,शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग यंत्राद्वारे फवारणी करण्यात आली आहे. वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी शेळके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT