vehicle theft sakal
सोलापूर

Solapur : मोहोळ तालुक्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले पेअँड पार्कची सोय करण्याची मागणी

मोहोळ तालुक्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकात घबराट पसरली आहे

राजकुमार शहा

मोहोळ तालुक्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकात घबराट पसरली आहे

मोहोळ : मोहोळ तालुक्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकात घबराट पसरली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज अनेक नागरिक आपल्या विविध कामासाठी शहरातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय यासह अन्य ठिकाणी येतात. नागरिक आपली मोटरसायकल संबंधित कार्यालयाच्या आवारात पार्क करून कामासाठी जातात. हीच संधी साधत मोटरसायकल चोर मोटारसायकलचे हँडल लॉक तोडून वेळप्रसंगी बनावट चावी लावून हातो हात मोटरसायकल लांबवितात.

विशेष म्हणजे मोहोळ शहराच्या हद्दवाढ भागातील तसेच शहरातील घरासमोरील पार्क केलेल्या मोटरसायकली ही चोरीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्ष भराच्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 37 मोटरसायकली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्या आहेत. त्यापैकी केवळ दहा मोटरसायकली तपासात सापडल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. मोहोळ परिसर हा अपघाती परिसर म्हणून ओळखला जातो, अपघात झाल्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात पथक अपघात ग्रस्त चार चाकी, दुचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या पुढील व मागील आवारात आणून लावतात. हुशार चोरटे या अपघातग्रस्त वाहनांचे रात्रीच्या वेळी सुटे भागही काढून नेत असल्याची चर्चा आहे. मोटारसायकल चोरीच्या भीतीमुळे कामासाठी आलेल्या नागरिकांचे निम्मे लक्ष कामात व निम्मे लक्ष मोटरसायकलीवर अशी सध्याची अवस्था आहे.

पे अँड पार्क योजना सुरू करावी---

मोहोळ तहसील व पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस राष्ट्रीय महामार्गा लगत मोठे पटांगण आहे. या ठिकाणी शासनाने चार चाकी व दुचाकी साठी सोलापूरच्या धरतीवर योग्य शुल्क आकारून पार्किंगची सोय केल्यास चोरीच्या घटना कमी होतील, पोलिसांचे कामही कमी होईल व नागरिकांना निश्चितपणे आपली कामे करता येतील. पे अँड पार्कची योजना सुरू केली तर शासनाला त्यातून महसूल तर मिळणार आहेच, पण किमान दोन ते तीन जणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

ही योजना मोहोळ तालुक्यातील काही पत्रकार व नागरिक यांनी प्रशासनाला सुचवली होती, मात्र त्यावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही. अनेकाकडे दुचाकीची कागदपत्रे नसतात. पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीची फिर्याद देण्यास गेल्यास कागदपत्रांची आवश्यकता लागते. त्यामुळे अनेक जण चोरीची तक्रार द्यायलाच येत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT