school esakal
सोलापूर

पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती! ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची अट

मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक घटकातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण संचालनालयातर्फे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते.

तात्या लांडगे

सोलापूर : मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक घटकातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण संचालनालयातर्फे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या आणि ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्या मुलांना दरमहा शिष्यवृत्ती मिळते.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पहिली ते दहावीतील मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी ५० टक्के गुणांची अट आहे, पण पहिलीतील विद्यार्थ्यांना गुणांची अट लागू नाही. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. अर्ज भरताना पालकांनी उत्पन्नाच्या दाखल्यावर दर्शवलेली रक्कमच नोंदवावी. चुकीचे उत्पन्न नोंदवलेले अर्ज अपात्र होतील. अर्जात गुणांची टक्केवारी नोंद करताना गेल्यावर्षी मिळालेल्या गुणांची टक्केवारी नोंदवावी. अर्जासोबत बोनाफाइड, आधारकार्ड, बँक पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत, मूळ उत्पन्नाचा दाखला, प्रगतिपत्रक तथा गुणपत्रिका झेरॉक्स अशी कागदपत्रे जोडावी लागतात. गेल्यावर्षी ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली, त्यांनी नूतनीकरणाचे अर्ज करावेत. www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, अशा सूचना अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिल्या आहेत. अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून कोणताही पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्तीसाठी अटी...

  • शासनमान्य शाळांमधील अल्पसंख्याक विद्यार्थी करू शकतात अर्ज

  • विद्यार्थ्याला मागच्या वर्षी ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असावेत

  • पालकांचे उत्पन्न वार्षिक एक लाख रुपयापेक्षा कमी असावे

  • एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३ टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव असणार

  • वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना तेथील शुल्काच्या पावत्या मुख्याध्यापकांना देणे बंधनकारक

  • एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT