Morcha. 
सोलापूर

"ओबीसी आरक्षण बचाओ'साठी "ज्योती क्रांती'चा शुक्रवारी तुळजापूर तहसीलवर ढाल मोर्चा 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : ओबीसी आरक्षण बचाओ यासह अन्य विविध मागण्यांसाठी तुळजापूर येथील तहसील कार्यालयावर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने ढाल मोर्चाचे आयोजन शुक्रवारी (ता. 6) दुपारी केल्याची माहिती या परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्य ओबीसीचे समन्वयक रमेश बारसकर यांनी दिली. मोर्चाचे नेतृत्व बारसकर स्वतः करणार असून, तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना बारसकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी महाराष्ट्रातील विविध ओबीसी संघटनांची मागणी होती. आरक्षणासाठी निघालेल्या मराठा मोर्चास ओबीसी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे, त्यामुळे विविध सामाजिक संघटनांचे व राजकीय पक्षांचे नेते मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असलेल्या सुमारे साडेतीनशेच्या वर छोट्या जातीचे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. ही अस्वस्थता सरकार दरबारी पोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बारसकर यांनी दिली. 

ढाल मोर्चाच्या जनजागृतीसाठी गेल्या महिनाभरापासून मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील, तालुक्‍यांतील ओबीसी नेत्यांशी संपर्क करून त्यांना या लढाईत सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. तसेच ओबीसी समाज हा 52 टक्के असताना त्यांना केवळ 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे, त्यामुळे ओबीसींची गळचेपी झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यास ओबीसींना असलेले आरक्षण असून नसल्यासारखे होईल. हा प्रकार टाळण्यासाठी ढाल मोर्चाचे आयोजन केल्याचे बारसकर यांनी सांगितले. 

मोर्चात महिला, तरुण, आबालवृद्धांनी सामील व्हावे, असे आवाहन बारसकर यांनी केले आहे. मोर्चासाठी ढाल, झेंडे यांचीही तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. 

खासदार अमोल कोल्हे यांनी, मराठा आरक्षणासाठी ओबीसींनी मोठे मन करावे, असे आवाहन केले आहे. त्यावर बारसकर यांनी, खासदार कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन गावातून निवडून येऊन किमान सरपंच होऊन दाखवावे म्हणजे आरक्षण म्हणजे काय, हे त्यांना समजेल, असा टोला या वेळी लगावला . 

"या' आहेत मागण्या... 

  • सामाजिक समतोलासाठी जातनिहाय जनगणना करण्यात यावी 
  • ठराविक कुटुंबेच राज्यकर्त्यांची भूमिका बजावत आहेत ते थांबले पाहिजे 
  • मराठा समाजाने बहुजनांना राज्यकर्त्यांची संधी दिली पाहिजे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

SCROLL FOR NEXT