congress. jpg. 
सोलापूर

पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून यावेत : काॅंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांचे मत

अमोल व्यवहारे

सोलापूर : येणाऱ्या महापालिका निवडणूकीत पक्ष बळकट करुन जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे आणि त्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी असे मत शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्त केले. 
सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या ई ब्लॉक ची बैठक रेवणसिद्धेश्वर मंगलकार्यालय येथे ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 
ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाला त्यागाची, सेवेची मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे व कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन कार्यकर्त्यांनी सोडविल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. यावेळी ई ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते यांचे भाषण झाले.शहराध्यक्ष प्रकाश वाले, बाजार समिती माजी सभापती महादेव चाकोते, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, प्रदेश पदाधिकारी राहुल वर्धा, सुमन जाधव, सहसचिव मल्लीनाथ सोलापूरे, संघमित्रा चौधरी, चिवरी वकील, मुकुंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी अप्पु शिवशिंपी, कल्याणराव चौधरी, सतीश पारेली, रेखाताई गवळी, विकी चाकोते यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

Farsawale Baba Death: गोरक्षकांना मिळणार 'शस्त्र परवाना' आणि विशेष सुरक्षा कवच; काय आहे योगींचा गोतस्करांविरुद्ध 'सीक्रेट' मास्टरप्लॅन?

Latest Marathi News Live Update : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मिरगावमध्ये दाखल

Ashok Kharat Case Exposes : चक्क ९ लाख रुपयांचा टर्किश मध! खरातचा फेमस प्रसाद कसा बनायचा ? तपासात उघड झाले धक्कादायक सत्य

Kolhapur jotiba : जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद; पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; दर्शन मात्र सुरळीत

SCROLL FOR NEXT