सोलापूर

माघी वारीसाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी... दर्शनासाठी लागताहेत 15 तास

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध भागातून दिंड्या पंढरपुरात दाखल होऊ लागल्या आहेत. सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी येथे आले असून श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर रस्त्यावर गेली होती. मंदिर परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. श्री विठूरायाच्या दर्शनासाठी आज तब्बल पंधरा तास लागत होते.

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. परगावाहून शेकडो विक्रेते आले आहेत. मंदिर परिसर तसेच प्रदक्षिणा मार्गासह सर्वच रस्त्यांवर जागोजागी विक्रेत्यांनी विविध वस्तूंचे स्टॉल उभा केले आहेत. माघी यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी कर्नाटक, कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या काही भागातून पायी दिंड्या येत असतात. यंदा देखील ठिकठिकाणाहून दिंड्या येथे आल्या आहेत. दरवर्षी पेक्षा यंदा यात्रेसाठी दोन दिवस आधी पासून भाविकांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे आज सोमवारी (ता.3) नवमीच्या दिवशी सकाळी दर्शन रांग सर्व सहा पत्राशेड भरून गोपाळपूर रस्त्यावर गेली होती.

आज श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन आलेले लक्ष्मण शंकर कांबळे (रा. इनाम कोळींद्रे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) म्हणाले, रविवारी (ता. 2) रात्री 9 वाजता आम्ही पाच नंबरच्या पत्राशेडमधील दर्शन रांगेत उभा होतो. सोमवारी दुपारी बारा वाजता दर्शन झाले. दर्शन रांगेच्या भागात रात्री अपुरा पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत होती. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना विविध सुविधा देण्यात येत आहेत. दर्शन रांगेत मंगळवारी जिलेबी, मसाले भात, बुधवारी माघी एकादशीला साबुदाणा खिचडी, गुरूवारी द्वादशीला बुंदी लाडु व मसाले भाताचे वाटप केले जाणार आहे. दर्शनाची रांग वेगाने पुढे सरकावी आणि भाविकांना जास्ती वेळ रांगेत थांबावे लागू नये यासाठी मंदिर समितीने अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.

स्नानाची चांगली सोय
नदीच्या पैलतीरावरील 65 एकरात वारकऱ्यांना मुक्कामासाठी 420 प्लॉट आहेत. तेथील बहुतांष प्लॉटमध्ये वारकरी मुक्कामास थांबले आहेत. नदी पात्रात पुरेसे पाणी असल्याने भाविकांच्या स्नानाची चांगली सोय झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी आज शहरात फिरून यात्रेसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताची पाहणी करुन पोलिसांना आवश्‍यक सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai : नवी मुंबईत निवडणूक आणि नववर्ष जल्लोषाची धामधूम; पोलिसांसमोर बंदोबस्ताचे आव्हान

प्राजक्ता माळी बिग बॉसमध्ये जाणार? चाहत्यांच्या प्रश्नावर स्पष्टच बोलली, लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Best Shares to Buy: एका वर्षात मालामाल करू शकतात हे शेअर्स! तज्ज्ञांची फेव्हरेट लिस्ट समोर; जाणून घ्या डिटेल्स

Pune News: ..अखेर बिबट मादी जेरबंद; चार दिवस पिंजऱ्याला हुलकावणी, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी साेडला सुटकेचा श्वास!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्या महत्त्वाच्या बैठका सुरू

SCROLL FOR NEXT