The mother saved the childs life by donating a kidney 
सोलापूर

जेव्हा काहीच उरत नाही, तेव्हा फक्त माय उरते 

सुनील कोरके

भोसे (क) (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) : गाव : भोसे (ता. पंढरपूर), नाव : जयंत संभाजी भोसले, वय- 30, पत्नी : नीता (वय 25), मुलगी : सिद्धी (वय 4), मुलगा : श्‍लोक (वय 2), परिस्थिती : नाजूक, व्यवसाय : शेती, सुखाने चाललेला संसार अन्‌ अचानक किडनीच्या आजाराचे निदान... पायाखालची जमीन सरकली. कसातरी संसाराचा गाढा ओढत असताना किडनीसारख्या दुर्धर आजारातून आपण कसे बरे व्हायचे? दवाखान्याचा खर्च कशाने करायचा? अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी मन खचू लागले. समोर भयाण काळोख दिसायला लागला. ही कोणत्या चित्रपटातील कहाणी नसून भोसे (ता. पंढरपूर) येथील एका युवकाला आईनेच किडनी देऊन जीवदान दिल्याची ही सत्य घटना आहे. 
असं म्हणतात, आयुष्यात जेव्हा काहीच उरत नाही, तेव्हा फक्त माय उरते. किडनीसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या व लहान दोन मुलांचा बाप असलेल्या तरुण मुलाचे भविष्य आठवून 49 वर्षांची माय आतल्या आत कुढत होती. वडिलांना शुगर व बीपीचा त्रास तर मोठ्या भावाच्या खांद्यावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी. पत्नीची किडनी देण्याची इच्छा असूनही किडनी देता येत नसल्याने नुकतीच संसार फुलवायची स्वप्ने बघणारी "ती' डोळ्यांतून अश्रू गाळत होती. 
अशातच आईने मन घट्ट केले. आयुष्यात कधीही दवाखान्याची पायरी न चढलेल्या मातेने आपली एक किडनी देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मोठा भाऊ यशवंत, बहीण दीपाली यांनी मोठे कष्ट सहन करून प्रसंगी उपाशी राहून पुणे येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये डॉ. पवन यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी रोपण शस्त्रक्रिया केली. आज दोन महिन्यांनंतर दोघांचीही तब्बेत व्यवस्थित असून या आजारातून पूर्ण मुक्त झाल्याचे समाधान मुलाला, आयुष्याच्या शेवटी आपला देह सार्थकी लागल्याचे समाधान आईला तर माझा संसार पुन्हा बहरास येईल याचे समाधान पत्नीला लाभले. याकामी डॉ. नीलकंठ कोरके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर अनेकांनी जमेल त्या पद्धतीने सहकार्य केले असून त्यांच्या मी ऋणात राहणे पसंत करीन, असे जयंत भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT