सोलापूर

सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केले आंदोलन

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः कोरोनामुळे जिल्ह्यातील सलून व्यवसाय बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नाभिक ाबंधवांची उपासमार होत आहे. ती टाळण्यासाठी सलून व्यवसाय सुरु करावा यासाठी आज महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्याचबरोबर त्यांच्या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

कोरोनामुळे शहर-जिल्ह्यातील सलून व्यवसाय बंद करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, ती पुन्हा रद्द करण्यात आली. सलून व्यवसाय बंद असल्याने कुटुंबियांची उपासमार होत आहे. त्यामुळे शासनाकडून 10 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणीही संघटनेच्यावतीने यापूर्वीच सरकारकडे केली आहे. पण, अद्यापही त्याबाबत विचार झालेला नाही. कोरोनामुळे मागील जवळपास दीड महिन्यांपासून शहर-जिल्ह्यातील सलून दुकाने बंद आहेत. राज्यातील लॉकडाऊन हळूहळू शिथिल केले जात आहे. पण, सलून दुकानाबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याची खंतही संघटनेच्यावतीने व्यक्त करण्यात आली. भविष्यातील बेरोजगारी टाळण्यासाठी लवकरच सलून दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अजूनही जर हा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी न दिल्यास राजाध्यक्ष कल्याण दळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी वैभव शेटे, मनोज डिगे, गणेश वाघमारे, स्वप्नील रणदिवे, आनंद वाघमारे, श्रीकांत राऊत, दिनेश विभूते, सिलीसिद्ध राऊत, राजशेखर वाघमारे, प्रशांत हडपद, नरहरी रायचूरकर, मनीष गंजाळकर उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT