MP Jayasiddheshwar Shivacharya Mahaswami said that the issue of tunnel at Machnur Chowk on Ratnagiri-Nagpur highway will be resolved through Public Works Minister Nitin Gadkari..jpg 
सोलापूर

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील माचनूर चौकातील बोगद्याचा प्रश्न मार्गी लावूच

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील माचनूर चौकातील बोगद्याचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मार्गी लावूच असे आश्वासन खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी माचणूर ग्रामस्थाना दिले. 
    
माचणूर चौकात बोगदा करावा, यासाठीची मागणी या भागातील नागरिकांनी खासदाराकडे  केली. त्यासाठी ते प्रत्यक्ष घटनास्थळी येवून त्यांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नागेश डोंगरे, जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष सुनील डोके, लाडीक डोके, राजू बाबर, आबासाहेब डोके विलास डोके, लिंबाजी डोके, दिपक कलुबर्मे, धनजंय गायकवाड, विठ्ठल डोके, आबासाहेब मेटकरी, बबन सरवळे, महादेव फराटे आदी उपस्थित होते. 

तालुक्यात रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चे काम सुरू असून माचनूर चौकात बोगदा न करता तो मुख्य चौकापासून जवळपास पूर्वेला अर्धा किलोमीटर अंतरावर भीमा नदी शेजारी प्रास्तावित केला. त्यामुळे रहाटेवाडी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना माचणूरच्या शाळेत जाण्यासाठी अर्धा किलोमीटर दूरवरून जावे लागणार आहे. शिवाय सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांना देखील लांबून प्रवास करण्याबरोबर येथील बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती गावाच्या दक्षिण भागात येत असल्यामुळे त्यांना शेताकडे ये जा करण्यासाठी जास्त अंतर कापावे लागणार आहे. 

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भीमा नदीला पूर आल्यानंतर सध्या प्रस्तावित बोगद्याचा पाण्याखाली जाऊ शकणार असल्यामुळे गावकऱ्यांचा शेतकऱ्याची शेती व विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी संपर्क तुटणार आहे. सर्वाना सोयीचे होण्याच्या दृष्टीने मुख्य चौकात बोगदा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही मागणी ग्रामपंचायतीने खा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे केली असता हा प्रश्न बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून मार्गी लावू.  या महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या ठेकेदाराला या या परिसरातील काम थांबवून उर्वरित काम मार्गी लावावे. बोगद्याचा प्रश्न मार्गी लावल्या नंतर या ठिकाणचे काम करावे अशा सूचना यावेळी दिल्या.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT