Praniti Shinde sakal
सोलापूर

Praniti Shinde : साळेच्या कर्तुत्वाचा वारसा तिसऱ्या पिढीत कायम :खा.शिंदे

Praniti Shinde : हुन्नूर येथे नवरात्र महोत्सवात खासदार प्रणिती शिंदे यांनी स्व. दलितमित्र बाबासाहेब साळे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वारसा प्रशांत साळे यांनी तिसऱ्या पिढीत यशस्वीपणे चालविल्याचे गौरवोद्गार काढले.

सकाळ वृत्तसेवा

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : गेली अनेक दशके हुन्नूर परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून सर्व घटकाशी सलोक्याशी वागणारे स्व.दलितमित्र बाबासाहेब साळे व गोकुळाबाई साळे यांच्या कर्तुत्वाचा वारसा प्रशांत साळे यांनी पुढे कायम ठेवल्याचे गौरवोद्गार खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील हुन्नूर येथे चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्येच्या वतीने नवरात्र महोत्सवात ग्रामस्थांना फराळ साहित्याची आपुलकीची भेट चे वितरण खा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी संस्थाध्यक्ष प्रशांत साळे, युवक तालुकाध्यक्ष ॲड रविकिरण कोळेकर, पुंडलिक साळे, उपसरपंच प्रवीण साळे,सदस्य संतोष क्षिरसागर, तुशांत माने, सुरेश चव्हाण, शिवदास पुजारी, ग्रामसेवक खताळ , मंडळाचे अध्यक्ष सुधीर बंडगर व ग्रामस्थ बहुसंख्य महिला उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाले की तालुक्याच्या दक्षिण भागातील सीमावर्ती भागातील शैक्षणिक,राजकीय, आणि सामाजिक दुष्काळ हटवण्यासाठी बाबासाहेब साळे यांनी या भागातील भटक्या विमुक्त जमातीतील मुलासह अन्य प्रवर्गातील मुलांना शैक्षणिक सुविधा व्हावी म्हणून चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याबरोबर त्यांनी राजकारणातील दुष्काळ हटवण्यासाठीछ मोहिते पाटील-शिंदे कुटुंबाशी सलोख्याचे संबंध ठेवत राजकारण केले त्यांच्या महान कार्याचा वारसा प्रशांत साळे पुढे चालवत असून ते दरवर्षी नवरात्र महोत्सव मध्ये हुन्नूर परिसरातील सर्व कुटुंबाला फराळाचे साहित्य देत आपुलकीचे भेट हा उपक्रम राबवून त्या प्रत्येक कुटुंबाची नाळ जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या भागातील पाण्यापासून मी सातत्याने प्रयत्न करत आहे हे प्रश्नासाठी मला समक्ष भेटात वाढ लेखी निवेदन द्या मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे तालुकाध्यक्ष साळे यांनी पर्यावरण संतुलनासाठी दरवर्षी वेगळ्या जातीचे 50 लक्ष लागवड याशिवाय या परिसरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त पुरवठा करण्याचे काम सुरू आहे व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप करून केले जाते याशिवाय वाडी वस्तीला जाणारा रस्ता नव्हता त्यांना रस्त्याची सोय उपलब्ध करून दिली. यंदाच्या उन्हाळ्यात 19 गावाला मोफत टँकर ने पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न केला. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी - वनमंत्री गणेश नाईक

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT