Praniti Shinde esakal
सोलापूर

'जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन मराठ्यांचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचवा'; खासदार प्रणिती शिंदेंकडे शिवसेनेची मागणी

चाळीस वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Community Reservation) शासनाकडे मागणी करत आहे.

हुकूम मुलाणी ​

मराठा समाजाच्या आरक्षण व सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत.

मंगळवेढा : चाळीस वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Maratha Community Reservation) शासनाकडे मागणी करत आहे. मात्र, याची कोणीही दखल घेत नाही. आरक्षणासाठी जरांगे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खराब होत चालली आहे. त्यामुळं त्यांच्या आंदोलनाला पाठिबा देऊन मराठा आरक्षणाचा आवाज दिल्ली दरबारी पोहचवण्याचे कामे करावे, अशी मागणी मंगळवेढा शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले यांनी खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) पत्राद्वारे केलीये.

या पत्रात त्यांनी म्हटलंय की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे मोलाचे सहकार्य आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षण व सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत.

स्थानिक आ. समाधान आवताडे हे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी असल्याने अद्याप त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका घेतली नाही, मात्र नवनिर्वाचित खासदार म्हणून आपण तात्काळ पाठिंबा देवून व सरकारवर दबाव आणणे आवश्यक आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे मराठा समाजाने मोठी ताकद उभी केल्याने विजयी झाल्या.

सध्या आरक्षणासंबंधी सुरू असलेल्या उपोषणस्थळी राज्यस्तरीय नेते भेटी देऊन पाठिंबा व्यक्त करत आहेत, अशात प्रणिती शिंदे यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका मांडली पाहिजे, असे मत निवेदनात शहराध्यक्ष भोसले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT