rohit bhagare and pradnya fate sakal
सोलापूर

MPSC Exam Result : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत रोहित भगरे, प्रज्ञा फटे यांचे यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत मंगळवेढ्याच्या रोहित भगरे व प्रज्ञा फटे या दोघांनी यश संपादन केले.

हुकूम मुलाणी ​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत मंगळवेढ्याच्या रोहित भगरे व प्रज्ञा फटे या दोघांनी यश संपादन केले.

मंगळवेढा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत मंगळवेढ्याच्या रोहित भगरे व प्रज्ञा फटे या दोघांनी यश संपादन केले.

आज लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये रोहित उत्तम भगरे यांनी राज्य सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये 588 गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादी दहावा क्रमांक मिळवला. यापूर्वी त्याची विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्याचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा नंबर एक मध्ये तर पाचवी ते दहावी शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले आहे. अकरावी बारावी दामाजी महाविद्यालयात तर उच्च 12 वी नंतर वालचंद कॉलेज सांगली येथे अभियंता ही पदवी संपादन केले. व त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी पुणे येथे करून त्यांनी हे संपादन केले. त्याचबरोबर प्रज्ञा दगडू फटे हिने 527 गुण मिळवत मुलीमध्ये 39 वा क्रमांकाने यश संपादन केले.

तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फटेवाडी येथे, तर माध्यमिक शिक्षण दामाजी हायस्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण दामाजी महाविद्यालय येथे तर पदव्युत्तर जे शिक्षण फर्गुशन कॉलेज पुणे येथे पार पडले. तिने देखील लोकसेवा आयोगाची तयारी पुणे ते करून तिने संपादन केले. दामाजी कारखान्याच्या प्रशासन विभागातील दगडू फटे यांची ती कन्या आहे. दुष्काळी तालुक्यामधील विद्यार्थ्यांचा ओढा अलीकडे स्पर्धा परीक्षाकडे वाढला आहे. त्यामध्ये अनेक जण यामध्ये यशस्वी झाले आहे. यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांच्या यशाबद्दल आ. समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात, अवताडे डिस्टलरीचे अध्यक्ष संजय अवताडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रदीप खांडेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, अजित जगताप, प्रतिक किल्लेदार, सोमनाथ माळी, अजित यादव यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT