सोलापूर

महावितरणने साधला उद्योजकांशी संवाद

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः औद्योगिक व उच्चदाब वीजग्राहक हे महावितरणसाठी महत्वाचे आहे. कोरोनाच्या सावटामुळे बंद असलेले उद्योग व मोठे व्यवसाय हळूहळू सुरु होत आहे. त्यामुळे या ग्राहकांकडे विशेष लक्ष देऊन अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच मीटर रिंडीग व बिलिंगसंदर्भातील प्रश्न तत्परतेने सोडविण्यास प्साराधान्ठीय दिले जाईल अशी ग्वाही पुणे येथील प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वेबिनार संवादात दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मोठे मॉल्स व व्यावसायिक अशा वीजग्राहकांशी महावितरणकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध प्रश्नांवर चर्चा व संवादाचे आयोजन केले होते. यामध्ये सोलापूर जिल्हयातील सुमारे 160 वीजग्राहकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 920 उद्योजक व ग्राहकांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत प्रादेशिक संचालक नाळे यांनी थेट संवाद साधला. यावेळी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सोलापूर चेंबर चेंबर अॉफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, पाॉवरलूम फेडरेशनचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सोलापूर औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष केशव रेड्डी, सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी अखिल बिटे, रुग्णालये प्रतिनिधी समीर इनामदार उपस्थित होते.

या वेबिनारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी व उद्योग परिसरात विविध योजनांमधून झालेली व प्रस्तावित वीजयंत्रणांची कामे आदींसह नवीन वीजदर निश्चितीकरणात उद्योगांसाठी असणारी सवलत, स्वतंत्र वेबपोर्टल, विविध ग्राहकसेवा आदींची सादरीकरणातून माहिती देण्यात आली. तसेच केडब्लूएचऐवजी केव्हीएच प्रणालीनुसार सुरु असलेली बिलींग आकारणी, लॉकडाऊन कालावधीतील स्थिर आकाराबाबत विविध प्रश्नांचे व शंकांचे प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांच्याकडून निरसन करण्यात आले. यावेळी उद्योजकांनी वीजपुरवठा व बिलींगबाबत विविध प्रश्न, अडचणी व समस्यांचा प्रादेशिक संचालक नाळे यांनी जागेवरच आढावा घेतला व त्याच्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांना विविध उपाययोजनांचे आदेश दिले. वेबिनारद्वारे थेट संवाद साधून विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्याच्या महावितरणच्या उपक्रमाचे उद्योजकांनी स्वागत केले व समाधान व्यक्त केले. यापुढे प्रादेशिक कार्यालयस्तरावर दर तीन महिन्यांनी वेबिनार आयोजन करून उद्योग व महत्वाच्या ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यात येईल, असेही श्री. नाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT