सोलापूर

पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात महावितरणचे एक कोटीचे नुकसान 

संतोष सिरसट

सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व बार्शी विभागातील वीजयंत्रणेला मागील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, पूरपरिस्थिती व ढगफुटीचा जबरदस्त तडाखा बसला आहे. या दोन्ही विभागात मिळून महावितरणचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी "सकाळ'ला दिली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे 80 टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले. 

145 गावांमधील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुमारे 407 लघु व उच्चदाबाचे वीजखांब वाहिन्यांसह कोसळल्याने 12 उपकेंद्र, 76 उच्चदाब वीजवाहिन्या व दोन हजार 414 रोहित्रांचा वीजपुरवठा बंद पडला होता. परिणामी 33 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, 48 तासांच्या कालावधीमध्ये 80 टक्के घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा तर 78 टक्के कृषीपंप व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. 

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी आज जिल्ह्यातील वीजयंत्रणेचे नुकसान व वीजपुरवठ्याच्या स्थितीबाबत व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी महावितरणचे संचालक दिनेशचंद्र साबू, पुणे प्रादेशिकचे संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे, सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते. 

माळशिरस तालुक्‍यातील पिलीव, मळोली, धानोरे, शेंडचिंचोली, तोंडले, बोंडले या गावांच्या परिसरात दोन तासांच्या कालावधीत सुमारे 220 मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली आहे. पंढरपूर तालुक्‍यातील भंडीशेगाव, सुपली, पळशी, उपरी, वाडीकुरुली या गावांत पुराच्या पाण्यामुळे वीजयंत्रणा कोसळली आहे. वीजयंत्रणा उभारण्यासोबतच सर्व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी (पंढरपूर), अनिल वडर (अकलूज), दीपक लहामगे (बार्शी) तसेच अभियंता, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT