सोलापूर

महावितरणने ग्राहकांसाठी हे करायलाच हवे... 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा. ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. 

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे महावितरणच्या विविध कामांचा आढावा घेतला. ज्या भागात वसुलीचे प्रमाण कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

वीज ग्राहकांनाचा सुरळीत वीजपुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे कामे करावी. ज्या एजन्सीकडे ही कामे दिली आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून कामांची गुणवत्ता तपासा आणि कामे संथपणे करीत असतील त्या एजन्सीला ब्लॅकलिस्ट करा, असे स्पष्ट आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. राज्यातील ज्या जिल्ह्याचे तापमान सरासरी 45 अंशापेक्षा अधिक आहे, अशा जिल्ह्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्याचे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. 

यावेळी महावितरणच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा ऊर्जामंत्र्यांनी घेतला. तसेच महावितरणमधील कर्मचारी संख्या, रिक्त पदे यांचाही आढावा ऊर्जामंत्र्यांनी घेतला. तसेच मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याबाबत प्राधान्याने कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी दिलेत. महावितरणची गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मनुष्यबळाचा आढावा घेण्यासही त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT