Mumbai officials arrived in Solapur to investigate the Markandey Hospital blast.jpg 
सोलापूर

मार्कंडेय रुग्णालय स्फोटाच्या तपासासाठी मुंबईचे अधिकारी सोलापुरात दाखल

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात झालेल्या ऑक्‍सिजन टाकीच्या स्फोटाच्या तपासासाठी केंद्र सरकारच्या मुंबईतील पेट्रोलियम अँड एक्‍स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचे उपनियंत्रक अरुण क्षीरसागर शनिवारी सोलापुरात दाखल झाले. त्यांनी चौकशी समिती सदस्यांसह घटनास्थळाची पाहणी करुन माहिती घेतली.

कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे म्हणाल्या, "रश्‍मी शुक्‍लांवर होणारे आरोप खोटे असतील तर आम्ही त्यांच्यासोबत..!'
 
मार्कंडेय रुग्णालयात झालेल्या स्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोलियम अँड एक्‍स्प्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचे उपनियंत्रक अरुण क्षीरसागर यांनी शनिवारी मार्कंडेय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीचे सदस्य असलेले औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे प्रमोद सुरसे, केमिकल इंजिनिअर्सचे सेफ्टी ऑडिटर अमर जेऊरकर उपस्थित होते. यावेळी या पथकाने रुग्णालयाच्या ऑक्‍सिजन प्लान्टचे कर्मचारी, प्लान्टचे मक्तेदार, रुग्णालयाचे संचालक व प्रशासनाकडून स्फोटासंदर्भात माहिती घेतली. या माहितीच्या आधारे अभ्यास करुन येत्या काही दिवसांत स्फोटासंदर्भात निष्कर्ष काढण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. 

पालकमंत्र्यांची रुग्णालयाला भेट 

दरम्यान या पथकाआधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी या रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्फोटाचे कारण नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT