SMC_Clerk. 
सोलापूर

नापास 51 डाटा ऑपरेटर घरी ! लिपिकांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय वेतनवाढ नाही; सातव्या वेतन आयोगाचाही पेच 

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेतील संगणकावरील कामे करण्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी विविध विभागांमध्ये 74 डाटा ऑपरेटरची कंत्राटी भरती करण्यात आली. वशिलेबाजीचा संशय असल्याने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी या कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली. त्यात अनुत्तीर्ण झाल्याने तब्बल 51 कर्मचाऱ्यांना आयुक्‍तांनी थेट घरचा रस्ता दाखविला आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नाचा काहीच विचार न करता अनावश्‍यक कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती प्रशासनाने यापूर्वी केल्याचे आयुक्‍तांच्या निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी कोरोनामुळे उत्पन्न कमी झाल्याचे सांगत काही महिन्यांपूर्वी स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले. दुसरीकडे पदोन्नतीने लिपिक झालेल्यांना संगणकाची पुरेशी माहिती नसल्याने ते स्वत:ची कामे कंत्राटी डाटा ऑपरेटरकडून करून घेत असल्याच्या तक्रारीही आयुक्‍तांकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार आयुक्‍तांनी लिपिकांच्या परीक्षा घेतल्या. मात्र, दोनदा परीक्षा घेऊनही 70 टक्‍क्‍यांहून अधिक लिपिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरले. कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर आणता येत नसल्याची तांत्रिक अडचण प्रशासनाच्या ध्यानात आली आहे. त्यामुळे आता परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या तथा संगणकीय कामकाज करता येत नसलेल्यांना पुढील (जून-जुलै) वेतनवाढ न देण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. जोवर लिपिक संगणक व टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत, तोवर त्यांना वेतनवाढ न देण्याच्या निर्णयावर आयुक्‍त ठाम असल्याचीही चर्चा आहे. आगामी काळात त्यांना आणखी एक संधी देऊन त्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. 

सातव्या वेतन आयोगास विलंबच 
राज्यातील बहुतेक विभागांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला असून आता तो शासनदरबारी पाठविला जाणार आहे. काही दिवसांत शासनाकडून त्यास मंजुरी मिळेल, अशी आशा आहे. मात्र, शासनाच्या मंजुरीनंतर महापालिकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरवर्षी सुमारे 43 कोटी रुपयांचा अधिक पगार द्यावा लागणार आहे. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता प्रशासनाकडून तो प्रस्ताव शासनाकडे केव्हा पाठविला जाईल, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे महापालिकेतील विविध विभागांमधील सुमारे दीड हजार पदे रिक्‍त होऊनही आकृतिबंध तयार नसल्याने आणखी काही वर्षे पदभरतीच होऊ शकत नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT