Padmkar Kulkarni.jpeg 
सोलापूर

मारुती चितमपल्ली यांना महापालिका मानपत्र देणार : महाराष्ट्र साहित्य परिषदे जुळे सोलापूरची मागणी 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. 

अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वास्तव करुन चितमपल्ली हे नुकतेच सोलापूर या मायभूमीत कायमच्या वास्तव्यासाठी परतले आहेत. त्यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान मोलाचे आहे. 2006 साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचा महापालिकेने मानपत्र देऊन नागरी सत्कार करावा, अशा मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने महापौर श्रीकांचना यन्नम यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, मसाप जुळे सोलापुरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, कार्यवाह गिरीष दुनाखे उपस्थित होते. 

5 नोव्हेंबर रोजी मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 12 नोव्हेंबर रोजी मारुती चितमपल्ली यांना भेटून त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येईल, असे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले. 
मसापच्या मागणीप्रमाणे चितमपल्ली यांना मानपत्र प्रदान करण्याचा निर्णय सभागृहात घेतला जाईल. त्यासाठी आवश्‍यक असलेला ठराव नोव्हेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुर करुन घेतला जाईल. सध्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे मानपत्र प्रदान सोहळा मसाप जुळे सोलापुरच्या मदतीने आचारसंहिता संपल्यानंतर घेण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले. 

स्मृतीवनला रायते यांचे नाव 

विजापूर रोडवरील स्मृती वनाला दिवंगत डॉ. वासुदेव रायते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी मसापच्यावतीने करण्यात आली. स्मृती वन उभारणीत डॉ. रायते यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचेच नाव स्मृती वनला देणे उचित असल्याचे पद्माकर कुलकर्णी यांनी सांगितले आणि ते महापौरांनी मान्य केले. याबाबतचा ठराव सभागृहात मंजुर करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही महापौरांनी यावेळी दिली. 


संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT