सोलापूर

या नगरपरिषदेने पाच दिवसातच केला इतका दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा

सांगोला (सोलापूर) : सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, दुकानदार व व्यावसायिकांनी मास्क, हॅन्ड ग्लोव्हज वापरणे, सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करणे बंधनकारक असताना काही नागरिक व दुकानदारांनी याचे पालन न केल्याने सांगोला नगरपरिषदेने अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत 25 ते 29 मे या पाच दिवसांत 76 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली. 

दंडात्मक कारवाईचे आदेश 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे, दुकानदार व्यावसायिकांनी मास्क व ग्लोव्हज वापरणे, सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिक, दुकानदार, व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

पाच दिवसांची कारवाई 
सांगोला नगरपरिषदेने 25 ते 29 मे दरम्यान पाच दिवसांच्या कालावधीत अशा विविध नागरिक, व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी मास्क, रूमाल न वापरणाऱ्या 206 जणांकडून 20 हजार 600 रुपये, फिरते फळे-भाजी विक्रेत्यांनी मास्क, हॅन्ड ग्लोव्हज न वापरणाऱ्या 18 जणांकडून तीन हजार 600 व दुकानदार, व्यावसायिकांनी मास्क व हॅंड ग्लोव्हज न वापरणाऱ्या 105 जणांकडून 52 हजार 500 असे एकूण 70 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्र केले आहे. 

संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी 
नागरिक, दुकानदारांकडून दंड वसूल करणे महत्त्वाचे नसून प्रत्येकाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी हे महत्त्वाचे आहे. सर्वांनीच नियमाचे काटेकोर पालन केल्यास आपणाला कोरोना संसर्गाला आळा घालता येईल. परंतु, नियमाचे पालन न केल्यास यापुढेही दंडात्मक कारवाई सुरूच असेल. 
- कैलास केंद्रे, 
मुख्याधिकारी, सांगोला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT