band vadan.jpg 
सोलापूर

विवाह समारंभात बॅंड वादनास महापालिकेची परवानगी 

तात्या लांडगे

सोलापूरः महापालिकेने बॅंड व्यवसायासह केवळ पाच वादकांची अट घालून गुरुवारी (ता.1) रोजी परवानगी दिली आहे. या वादकांना केवळ हाताने वाजवता येणारे वाद्य वाजवता येतील. 

महापालिकेने या बाबत आज आदेश काढले आहेत. मागील काही महिन्यापासून बॅंड व्यवसायाला परवानगी दिलेली नव्हती. या बाबत बॅंड व्यावसायिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन व मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आज महापालिकेने त्या बाबत सविस्तर आदेश काढले. 

सध्या शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रिडा, राजकीय व धार्मिक कार्यक्रम, सभा व संमेलनांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बॅंड व्यावसायिकांना फक्त लग्न समारंभात वाद्य वाजवण्याची परवानगी दिली आहे. बॅंड पथकातील एकूण पाच वादकांना सहभागी होता येईल. सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत बॅंडवादन करता येणार आहे. वाद्ये वाजवताना सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक असणार आहे. वाद्ये वाजविणाऱ्या व्यक्तींनी फेस कव्हर, गॉगल्स, मास्क, रुमाल, हॅंडग्लोव्हज, सॅनिटायझर याचा वापर करणे आवश्‍यक असणार आहे. 
बॅंड पथकाने वाद्ये वाजविण्यापुर्वी व नंतर ही सर्व वाद्ये सॅनिटाईझ करून घ्यावीत. बॅंड पथकाला केवळ हाताने वाजवता येणाऱ्या वाद्यासाठी परवानगी असणार आहे. तोंडाने वाजवता येणाऱ्या वाद्याला परवानगी असणार नाही. सर्व वादकांना सॅनिटायझरचा वापर व साबणाने सतत हात धुणे आवश्‍यक असणार आहे. वाद्य वाजवताना डोळे, नाक व चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे. सर्दी, ताप व श्‍वासोच्छवास किंवा कोविडचा त्रास असणाऱ्या बॅंडवादनात सहभागी होता येणार नाही. तसेच 65 वर्ष वयावरील वादकास बॅंड वादनाची परवानगी असणार नाही असे या आदेशात म्हटले आहे. या सोबत व्ही.डी.ओ.गेम व एमएससीआयटी प्रशिक्षणाला परवानगी दिली आहे. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT