crime News esakal
सोलापूर

Crime News : पोंधवडी येथे विवाहितेचा खुन

जेवत्या ताटावर तलवारीने वार करून केला खून

आण्णा काळे

करमाळा : पोंधवडी (ता.करमाळा) येथे विवाहित महीलेचा तलवारीने वार करून खुन करण्यात आला आहे. सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जेवण करत असताना जेवत्या ताटावर तलवारीने वार करून हा खून झाला आहे. कोमल बिबिषण मञे (वय 24) असे खुन झालेल्या महीलेचे नाव आहे. ही घटना मंगळवार ता.16 रोजी राञी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

ही विवाहीत महीला माहेरी रहात होती.ती महीला ,तीची आई,भाव व भावजय जेवन करत असताना 7 ते 8 जण मोटारसायकल वरून आले.आल्यानंतर जेवन करत असलेल्या विवाहीतेवर तलवारीने वार करण्यास सुरवात केली. यावेळी आई, भाव ,भावजय मध्ये आले माञ त्यांना बाजुला सारून या विवाहीतेवर तलवारीने वार केले. तलवारीने वार करून विवाहीत महीलेचे शरीर छिन्नविछिन्न केले असल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.मारेकराची एक मोटारसायकल घरासमोरच राहीली आहे.या महिलेला एक चार वर्षाचा मुलगा आहे.मुलीचे वडील आषाढी वारीत पंढरपूरला गेले होते या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक श्री.दळवी पोलीस हवालदार बालाजी घोरपडे ,पोलीस शिपाई ,अजर शेख,पोलीस शिपाई ज्ञानेश्वर घोंगडे, पोलीस शिपाई वैभव ठेंगल,पोलीस शिपाई आप्पासाहेब लोहार, पोलिस शिपाई महेश डोंगरे घटनास्थळी दाखल झाले आहेत याबाबत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT