Solapur Crime  sakal
सोलापूर

Solapur Crime : बायकोला नांदायला पाठविले नाही म्हणून मेव्हण्याच्या पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

पत्नीला नांदायला न पाठविल्याच्या रागातून महेंद्र सुभान भोसले (वय २३), महेर ऊर्फ मयूर रामा भोसले (वय २४) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शीतल अर्जुन काळे या गर्भवतीच्या खुनात दोषी धरले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पत्नीला नांदायला न पाठविल्याच्या रागातून महेंद्र सुभान भोसले (वय २३), महेर ऊर्फ मयूर रामा भोसले (वय २४) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शीतल अर्जुन काळे या गर्भवतीच्या खुनात दोषी धरले. त्यातील महेंद्र भोसले यास जन्मठेपेची तर महेर भोसले याला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. यातील बाळासाहेब सुभान भोसले हा आरोपी २० एप्रिल २०२० पासून फरार आहे.

गर्भवती शीतल काळे व फिर्यादी मयताचा पती अर्जुन काळे २० एप्रिल २०२० रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवण करून अरबळी (ता. मोहोळ) येथील शेतातील वस्तीवर झोपले होते. त्यावेळी बहिणीचा पती महेंद्र व त्याचा भाऊ मेहर आणि बाळासाहेब हे तिघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी माया कोठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी ती याठिकाणी नसून आईकडे बेगमपूरला असल्याचे अर्जुनने त्यांना सांगितले. त्यानंतर चिडलेल्या तिघांनी जंबिया चाकूने अर्जुनच्या हातावर व बगलेत वार केले. त्यावेळी भांडण सोडवायला अर्जुनची पत्नी शीतल आली. त्यावेळी आरोपींनी तिच्यावरही वार केले व पोटात चाकू भोसकला. शीतल जमिनीवर पडली व जागेवरच ठार झाली.

आरोपीने त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकलीवरही वार करून तिलाही जखमी केले. अर्जुन जिवाच्या आकांताने ओरडला व शेजारील लोक त्याठिकाणी आले. त्यावेळी आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणी अर्जुन काळे यांनी कामती पोलिसांत २१ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.

फिर्यादी, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांची साक्ष गुन्ह्यात महत्त्वाची ठरली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. राणे यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली. आारोपीतर्फे ॲड. बायस व ॲड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.

आरोपींच्या वकिलांचा बचाव, पण...

शीतलचा मृत्यू अंधारात तोल जाऊन शेतीच्या धारदार अवजारावर पडल्याने झाला असून खरे आरोपी दुसरेच आहेत, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. पण, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी सर्व पुरावे न्यायालयासमोर ठेवत जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना शिक्षा ठोठावली. ॲड. राजपूत यांच्या कार्यकाळातील ही १०१ वी जन्मठेप ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT