2Solapur_20Crime_22.jpg 
सोलापूर

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून ! जोडभावी पेठ पोलिसांनी संशयिताला काही तासांतच पकडले 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सलीम राजअहमद शेख (रा. राही मंगल कार्यालयामागे, शेळगी) आणि त्याची बायको दोघेही हमालीचे काम करत होते. सलीमच्या बायकोचे शेळगी परिसरात राहणाऱ्या नबीलाल रजाक शेख (रा. मित्रनगर, शेळगी) याच्यासोबत ओळख झाली. ओळखीतून त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अनैतिक संबंधाची माहिती सलीम त्याच्या आईला झाली आणि त्यांनी सुनेला तसे वागू नको म्हणून समजूत काढली. मात्र, नबिलाल याला त्याची माहिती मिळाली आणि त्याने सलीमचा खून केला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. जोडभावी पेठ पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक बाबी... 

  • मृत सलीम हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत करीत होता हमाली 
  • सलिमच्या बायकोचे शेळगी परिसरातील एका तरुणाशी होते अनैतिक संबंध 
  • सलीम व त्याच्या आईला अनैतिक संबंधाची मिळाली माहिती; सासूने सुनेची काढली होती समजूत 
  • संशयित आरोपी नबीलाल हा मंगळवारी (ता. 9) सलीमला त्याच्या घराजवळून दुचाकीवर बसवून बाहेर घेऊन गेला 
  • घोडेपीर दर्ग्याजवळील वडाच्या झाडाखाली दोघेही बसले; काहीवेळाने त्यांच्यात भांडण झाले अन्‌ नबीलालने सलीमच्या डोक्‍यात हत्याराने वार केला 
  • नबीलालने सलीमच्या डोक्‍यात मारल्याने त्याचा जागेवरच झाला मृत्यू; जोडभावी पेठ पोलिसांची माहिती 
  • पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासांतच नबीलालला घेतले ताब्यात; अनैतिक संबंधातून खून झाल्याची समोर आली माहिती 
  • जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. करणकोट हे करीत आहेत या गुन्ह्याचा तपास 


खून झालेल्या दिवशी सलीम व त्याची बायको बाजार समितीत हमालीसाठी गेले. दुपारी तीन वाजता दोघेही घरी आले आणि साधारणपणे चार वाजता नबीलाल त्याठिकाणी आला. त्याने सलीमला त्याच्या दुचाकीवर बसविले आणि दहिटणे परिसरातील घोडेपीर दर्ग्याजवळ नेले. त्याठिकाणी एका वडाच्या झाडाखाली दारु पित दोघेही बसले. काहीवेळाने नबीलालने सलीमच्या डोक्‍यात धारधार शस्त्राने वार केला. त्यावेळी सलीम रक्‍ताच्या थारोळ्यात पडला आणि नबीलाल हा तिथून पसार झाला. सलीमच्या खूनाची माहिती त्याची आई नसिमा यांना समजली आणि त्यांनी रिक्षा करून घटनास्थळ गाठले. दरम्यान, सहायक पोलिस आयुक्‍त कलामकर ताकवले, जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम हेदेखील घटनास्थळी होते. सलीमच्या आईच्या सांगण्यावरून पोलिसांनी रात्री उशिरा नबीलालला ताब्यात घेतले होते. पोलिस तपासानंतर सलीमचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले, असे पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT