Crime 
सोलापूर

पत्ते खेळण्याच्या वादात विंचूर येथे तरुणाचा खून; तिघांना अटक 

महासिद्ध साळवे

कुसूर (सोलापूर) : विंचूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे पत्ते खेळण्याच्या किरकोळ भांडणावरून एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी शंकरनगर येथील तीन संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. 

नागनाथ सुरेश साबळे (वय 28, रा. विंचूर, तालुका दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी गुरुनाथ भिवा पवार, प्रवीण गुरुनाथ पवार व सुनील गुरुनाथ पवार (तिघेही रा. शंकरनगर, तालुका दक्षिण सोलापूर) असे खून केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

याबाबतची माहिती अशी, की मृत नागनाथ सुरेश साबळे व संशयित आरोपी प्रवीण पवार यांच्यामध्ये विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेत पत्ते खेळताना बुधवारी पाच वाजता भांडण झाले. त्यानंतर प्रवीण पवार याने शंकरनगर येथे जाऊन वडिलांना व भावाला याची माहिती दिली. त्यानंतर वरील ठिकाणी विंचूर येथील इंदिरा नगरजवळ सायंकाळी नागनाथ साबळे याला जबर मारहाण केली. शुक्रवारी सकाळी नागनाथ साबळे यास जास्त त्रास होऊ लागला. उपचारास घेऊन जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मंद्रूपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तीनही संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी मृताचा भाऊ सचिन सुरेश साबळे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT